Vishwajit Rane Dainik Gomantak
Video

Forest Department: 'त्या' वन कर्मचाऱ्यांसाठी आशेचा किरण! रोजंदारी कामगारांसाठी मंत्री राणे करणार प्रयत्न

Vishwajit Rane: वन खात्यातर्फे आयोजित आठव्या पक्षी महोत्सवाच्या आभासी पद्धतीने उद्‍घाटन केल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

Sameer Panditrao

पणजी: वनखात्यात सोळावर्षे कमी वेतनात रोजंदारीवर काम करीत आहेत, त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सोसायटीप्रमाणे त्यांना न्याय द्यावा, त्यांना सुरक्षीतता मिळावी यासाठी आपला प्रयत्न आहे. त्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे आपण लवकरच याविषयावर चर्चा करणार आहोत, अशी माहिती वनमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

वन खात्यातर्फे आयोजित आठव्या पक्षी महोत्सवाच्या आभासी पद्धतीने उद्‍घाटन केल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्याशिवाय प्राण्यांना वाचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘प्राणी रेस्क्यू ॲप''चा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर `ब्लूम्स ॲण्ड बर्ड्स ऑफ गोवा फॉरेस्ट'' व `थ्रेटन बर्ड्स ऑफ गोवा‘ या पुस्तकांचे प्रकाशन मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता, वनखात्याचे प्रवीण कुमार राघव व इतरांची उपस्थिती होती.

राणे म्हणाले, कृषी खात्याचा रोजंदारीचे वेतन वेगळे आहे आणि वनखात्याकडे वेगळे आहे. रोजंदारीच्या विषयावर आम्ही मजूर खात्याकडून स्पष्टीकरण घेणार आहोत, त्यानंतर त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे याविषयी चर्चा करून वनखात्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन ठरविले जाणार आहे.

ते पुढे म्हणाले,की पक्षप्रेमींना विविध पक्षांचे नक्की काय चालले आहे, हे जाणून घ्यायचे असते. आपण सर्वांनी एकत्र येऊन इतर राज्यांमध्ये काय चालले आहे, हे पाहण्यासाठी तज्ञांना सोबत घेतले पाहिजे. ते पुढे म्हणाले, राज्यात लहान उद्याने आहेत तेथे इकोसिस्टम कशी तयार करू शकतो आणि इकोसिस्टम बनण्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील, हे पाहणे आवश्यक आहे. तसे करायचे झाल्यास आत्तापासून नियोजन करावे लागेल.

जंगलात वेळ घालवणे आवडते,पण...!

महोत्सवाच्या उद्‍घटनावेळी राणे म्हणाले, आपण वाइल्डलाइफ फोटोग्राफरही आहे, मला काही वेळ जंगलात घालविणे आवडते. परंतु दुर्दैवाने, गेल्या वर्षभरात आपण तसा वेळ घालविला नाही. आपण बर्ड ऍटलिस्ट ठेवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरुन सर्व पॅटर्न खरोखरच समजेल. त्याशिवाय कोणत्यावेळी कोणता ऋतू आहे, कोणते पक्षी त्यावेळी येतात, याची माहिती असणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

SCROLL FOR NEXT