Fatorda Fire Incident Dainik Gomantak
Video

Fatorda News: फातोर्ड्यात आगीचे तांडव! ‘अग्निशमन’ने वाचविली 20 लाखांची मालमत्ता

Fatorda Fire Incident: फातोर्डा येथे एका फ्लॅटला आग लागण्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण ठेवून अंदाजे २० लाखांची मालमत्ता वाचविली.

गोमन्तक डिजिटल टीम

Fatorda Fire Incident

मडगाव: फातोर्डा येथे एका फ्लॅटला आग लागण्याची घटना शनिवारी मध्यरात्री १ वाजण्‍याच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण ठेवून अंदाजे २० लाखांची मालमत्ता वाचविली.

फातोर्डा येथील सिंक्रो हॉटेलजवळ एका इमारतीत पहिल्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. साविनो डिमेलो या फ्लॅटच्‍या मालकीण आहेत. एका कार्यक्रमानिमित रात्री घरची मंडळी बाहेर गेली होती नंतर आगीची वरील दुर्घटना घडली. मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गील सौझा यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. वीजपुरवठा बंद करून बॅटरीच्या प्रकाशात आग विझविली. या घटनेत सोफा, टीव्ही, लॅपटॉप व अन्य वस्तू जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी एका बंबाचा वापर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT