Sattari no entry zone Dainik Gomantak
Video

Sattari News: 'उभो गुणो नो एंट्री झोन' करा! पर्यटकांच्या गैरवर्तणुकीमुळे सत्तरीवासीयांची मागणी

Morlem Local Issue: अनेकवेळा रात्री-अपरात्री देखील पर्यटकांचा गोंधळ आणि धिंगाणा सुरूच असतो

Akshata Chhatre

सत्तरी: राज्यातील सत्तरी तालुका हा वनराई आणि पर्यावरणासाठी ओळखला जातो. सध्या गरमीच्या दिवसांत अनेक ठिकाणहून पर्यटक इथे भेट देतात. सत्तरीत वाळवंटी नदीवर ‘उभो गुणो’ नावाची एक जागा बरीच प्रसिद्ध आह, इथे गरमीच्या हंगामात लोकं अंघोळ करण्यासाठी येतात. मात्र मोर्ले पंचायतीकडून ‘उभो गुणो’ इथे पर्यटकांच्या येण्यावर बंदी घालण्याची मागणी केलीये.

पर्यटक इथे येतात आणि अन्न शिजवून खातात मात्र राहिलेले पदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या तशाच मागे टाकून जातात. यामुळे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. अनेकवेळा रात्री-अपरात्री देखील पर्यटकांचा गोंधळ आणि धिंगाणा सुरूच असतो, यामुळे स्थानिकांना त्रास होत असल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी पर्यटकांच्या ‘उभो गुणो’ या ठिकाणी येण्यावर बंदी घालावी अशी मागणी केलीये.

काहीवेळा येणारे काही तरुण पर्यटक दारूच्या नशेत नदीत उतरतात आणि म्हणूनच नदीत बुडून मृत्यू होण्याची प्रकरणं देखील वाढत असल्याचं स्थानी म्हणाले आहेत तसेच त्यांच्याकडून सत्तरीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना लिखित निवेदन सादर करण्यात आलंय.

नदीच्या पात्राची खोली नेमकी किती आहे याचा अंदाज कोणालाही नाही, यापूर्वी देखील एका १६ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला होता आणि आता आणखीन अशी प्रकरणं होऊ नयेत म्हणून मोर्लेचे सरपंच अमित शिरोडकर यांनी पर्यटकांना इथे न येण्याची विनंती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Illegal Houses Goa: एक लाख घरे होणार कायदेशीर? केवळ मालकी हक्क नसलेली घरे ‘बेकायदेशीर’ म्हणून गणली जाणार का!

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT