Vijai Sardesai Dainik Gomantak
Video

Goa Assembly 2025: गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाईंनी जातीची गणना करण्याची केली मागणी

Vijai Sardesai: राज्यात जातीनिहाय जनगणना केली जावी, अशी जोरदार मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत शून्य तासाला केली.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात जातीनिहाय जनगणना केली जावी, अशी जोरदार मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत शून्य तासाला केली. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘नोंद घेतली’, अशा एका शब्दात उत्तर दिले.

सरदेसाई म्हणाले, राज्याच्या लोकसंख्येच्या किमान ५० टक्के लोकसंख्या ही इतर मागासवर्गीयांची आहे. भंडारी समाजासह १९ समाजांचा त्यात समावेश आहे. शेवटची जातीनिहाय जनगणना २०११ मध्ये झाली होती. सरकारी योजनांचा आर्थिक, सामाजिक लाभ या समाजाला देण्यासाठी त्यांची नेमकी संख्या किती याची माहिती सरकारकडे असणे आवश्यक असते.

पूर्वीच्या आकडेवारीवर सरकार निधीचे वाटप करत असल्याने इतर मागासवर्गीय समाजावर राज्यात अन्याय होतो. तो अन्याय दूर करण्यासाठी नवी आकडेवारी सरकारला मिळवावी लागेल. यासाठी जातीनिहाय जनगणना राज्यात केली जावी आणि ती केली जाईल, असे आश्वासन सरकारने द्यावे.

विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे यासाठी जनगणना हा पाया आहे, असे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सर्व विरोधकांची एकजूट गरजेची! युरींचा महायुतीचा पुनरुच्चार; आप,आरजीला सोबत घेण्याची तयारी

Goa Nightclub Fire: अजय गुप्ताला पाच दिवसांची पोलिस कोठडी, रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर

Goa Crime: कांदोळीतील व्हिलामध्ये चोरी, लाखोंचा ऐवज लंपास; कळंगुट पोलिसांत तक्रार

Mungul Gangwar: मुंगूल गँगवॉरप्रकरणी अमोघ नाईकला सशर्त जामीन मंजूर, इतरांच्या जामिनावर सोमवारी निवाडा

Goa Cristmas Celebration: नाताळनिमित्त राजधानीत विद्युत रोशणाई, चर्चस्क्वेअर परिसर सजला; राज्यात उत्साहाचे वातावरण

SCROLL FOR NEXT