Pilgao Vayangini Farming Dainik Gomantak
Video

Pilgao: फक्त दोन शेतकरी उतरले शेतात! ‘वायंगण’बाबत अनास्था; पिळगावात 90 टक्के जमीन पडीक

Pilgao Farming Issue: परिसरातील यंदा जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी वायंगण शेती करण्याकडे पाठ केल्याचे समजते. त्यामुळे यंदा पिळगावात वायंगण शेतीपिक घटणार हे जवळपास स्पष्ट आहे.

Sameer Panditrao

Vayangini Farming Decline in Goa Pilgao

डिचोली: पिळगावात यंदा प्रथमच ‘वायंगण शेती’ लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये अनास्था असल्याचे दिसून येत आहे. पिळगाव गावात यंदा मोठ्या प्रमाणात वायंगण शेती पडीक पडल्याचे चित्र दिसून येत आहे. पिळगावात फक्त दोनच शेतकरी यंदा शेतात उतरले आहेत.

परिसरातील यंदा जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी वायंगण शेती करण्याकडे पाठ केल्याचे समजते. त्यामुळे यंदा पिळगावात वायंगण शेतीपिक घटणार. हे जवळपास स्पष्ट आहे. ऐन भात पिकाच्यावेळी निर्माण होणारी पाणी टंचाई त्यातच कबुतरांचा उपद्रव, वाढती महागाई आणि युवा पिढीची अनास्था. ही वायंगण शेतीकडे दुर्लक्ष करण्यामागील कारणे आहेत, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांकडून मिळाली आहे.

डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पिळगावसह मये, बोर्डे, धुमासे-मेणकूरे, कुडचिरे आदी ठरावीक भागात अजूनही पारंपरिक वायंगण शेती लागवड करण्यात येते. अन्य भागांच्या तुलनेत पिळगावात एक ते दीड महिना अगोदरच वायंगण शेती लागवडीची कामे हाती घेण्यात येतात. दरवर्षी साधारण जानेवारी महिन्यानंतर पिळगावात पाण्याची टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे खरीप भातपीक घेतल्यानंतर शेतकरी लगेचच वायंगण शेतीच्या कामाकडे वळतात. यंदा मात्र तसे चित्र दिसून येत नाही.

युवा पिढीचे दुर्लक्ष!

पिळगावात दोघांनीच तरव्याची लागवडही केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी वायंगण शेती करण्याकडे फिरवलेली पाठ पाहता पिळगावात यंदा वायंगण शेती लागवडीचे प्रमाण घटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. वायंगण शेती बहरात यायच्यावेळीच पाण्याची मारामारी त्यातच कबुतरांचा उपद्रव आणि ‘मानायां’ची कामतरता यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण होत असते. युवा पिढीमध्येही अनास्था दिसून येते, असे काशिनाथ पेडणेकर या शेतकऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT