Canacona Post Office Dainik Gomantak
Video

Canacona Post Office: काणकोण पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे लोकांची गैरसोय

Canacona Post Office Staff Shortage: काणकोण येथील मुख्य टपाल कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वाढत्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona Post Office Staff Shortage

आगोंद: काणकोण येथील मुख्य टपाल कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वाढत्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. साध्या कामाकरता तासभर रांगेत ताटकळत उभे रहावे लागत असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते विशाल पागी व निवृत्त मुख्याध्यापक उल्हास पै भाटीकर यांनी केल्या आहेत.

तालुक्यातील ७ पंचायती व नगरपालिका क्षेत्रातील नागरिक तसेच येथे येणाऱ्या देश विदेशातील नागरिकांची संख्या वाढत असून या टपाल कार्यालयातील २ कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आल्यानंतर नव्या कर्मचाऱ्यांची त्या जागी नवीन नेमणूक करण्यात आली नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.

याठिकाणी रेल्वे तिकीट आरक्षण करण्यासाठी सोय आहे, मात्र कमी कर्मचारी व तांत्रिक गोष्टीमुळे तेही शक्य होत नाही. येथे असलेले डाक कर्मचारी तरीसुद्धा चांगले काम करत आहेत. त्यांना पाणी पिण्यासाठीही सवड मिळत नाही, तेही अखेर माणूसच आहेत, असे उल्हास पै भाटीकर पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor at IFFI 2024: आलियाने विचारलं" किशोर कुमार कोण आहे?" रणबीरने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; Video Viral, चाहते नाराज

Goa Live News: आरोग्यमंत्री राणेंनी घेतली फडणवीसांची भेट; विजयाबद्दल केले अभिनंदन

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

SCROLL FOR NEXT