Curti Fire News: Dainik Gomantak
Video

Curti Fire News: कुर्टी येथे एमआरएफ कंपनीच्या गोदामाला आग; दीपनगर परिसरात धुराचे लोट

Curti Fire News: फोंडा येथील दीपनगर-कुर्टी भागात असलेल्या एमआरएफ (MRF) कंपनीच्या एका शेडला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Manish Jadhav

फोंडा येथील दीपनगर-कुर्टी भागात असलेल्या एमआरएफ (MRF) कंपनीच्या एका शेडला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच फोंडा आणि आसपासच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

शे़डमध्ये टायर आणि रबरसारख्या ज्वालाग्रही वस्तू असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Trigrahi Yoga 2026: सूर्य, मंगळ आणि बुधाचा 'त्रैग्रही योग'; 'या' 5 राशींना मिळणार अमाप संपत्ती आणि प्रगतीची सुवर्णसंधी!

'मोसाद'शी संबंधित हेराला इराणमध्ये फाशी, हिंसाचाराचा ठेवला ठपका; जागतिक स्तरावर संतापाची लाट, पण तेहरान ठाम!

विमान उडाले, पण मुले खालीच राहिली! विसरभोळेपणाचा कळस आणि मातेचा टाहो; तुमची स्मरणशक्ती तुम्हाला दगा तर देत नाही ना?

Sreesanth: "भज्जीनं थप्पड कांड विकलं!" श्रीसंतचा हरभजन सिंहवर कोट्यवधींच्या कमाईचा आरोप; क्रिकेट जगतात खळबळ

Bank Robbery: 10 मिनिटात 7 कोटींचं सोनं आणि 5 लाखांची रोकड केली लंपास! झारखंडमध्ये बँकेवर दरोडेखोरांचा छापा; कर्मचारी-ग्राहकांना ठेवलं ओलीस

SCROLL FOR NEXT