Curchorem Health Camp Dainik Gomantak
Video

Curchorem: आरोग्य सुविधा लोकांच्या दारापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न, राणेंचे प्रतिपादन; कुडचडे आरोग्य शिबिराला प्रतिसाद

Curchorem Health Camp: कुडचडे आणि परिसरातील रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. तपासणी करून रुग्णांना योग्य सल्ला देण्यात आला.

Sameer Panditrao

केपे: राज्यातील आरोग्य सुविधा लोकांच्या दारापर्यंत पोहचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आरोग्य सुविधांपासून लोक वंचित राहू नयेत, यासाठी आरोग्य खाते सर्व ती काळजी घेत असल्याचे आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले. ते कुडचडे येथे कुडचडे आरोग्य केंद्रातर्फे आयोजित आरोग्य शिबिरात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.यावेळी आमदार नीलेश काब्राल, नगराध्यक्ष प्रसन्ना भेंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कुडचडे आरोग्य केंद्राला जरी जिल्हा हॉस्पिटलचा दर्जा दिला असला तरी अद्याप याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याने काहीप्रमाणात रुग्णांना त्रास होतो. पण येत्या दोन वर्षांत सर्व सुविधा लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

गोवा राज्य हे आरोग्य सुविधा देण्यास प्रथम क्रमांकावर असून कर्करोगाचे पूर्वीच निदान करण्यासाठी कार्यरत असून अशी अनेक आरोग्य शिबिर आयोजित केल्याने कर्करोगाचे पूर्वीच निदान केल्याने कित्येकांना खास करून महिलांना याचा फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असून लोकांना रुग्णवाहिका सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून आमचे प्रयत्न असल्याचे मंत्री विश्‍वजीत राणे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कुडचडे आणि परिसरातील रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. तपासणी करून रुग्णांना योग्य सल्ला देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

Horoscope: लक्ष्मीपूजन होणार फलदायी! दिवाळीच्या काळात 'या' 5 राशींना मिळणार यश आणि संपत्ती, वाचा सविस्तर दैनिक राशी भविष्य

SCROLL FOR NEXT