Curti Nagzar Tree Collapse Dainik Gomantak
Video

Curti Nagzar: नागझर-कुर्टी येथे घरावर कोसळला माड

Curti Nagzar Tree Collapse: नागझर-कुर्टी भागात सीताराम नाईक यांच्या घरावर गुरुवारी (ता.२६) दुपारी २ वा.च्या सुमारास अचानक एक माड कोसळला. यामुळे घराचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Sameer Panditrao

फोंडा: नागझर-कुर्टी भागात सीताराम नाईक यांच्या घरावर गुरुवारी (ता.२६) दुपारी २ वा.च्या सुमारास अचानक एक माड कोसळला. यामुळे घराचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने माड कोसळला त्यावेळेला त्या खोलीत कुणीच नव्हते, त्यामुळे अनर्थ टळला. माड कोसळल्याने अर्धे छप्पर मोडले आहे.

माड कोसळल्यानंतर स्थानिक पंचसदस्य बाबू च्यारी व जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व वीज खाते तसेच फोंडा अग्निशामक दलाला कळवल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित धाव घेऊन घरावर पडलेला माड हटवला. तर वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत केला.

दरम्यान, जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी व पंचसदस्य बाबू च्यारी यांनी कुर्टी भागातील धोकादायक झाडे त्वरित हटवण्यासाठी आपत्कालीन विभागाने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या धोकादायक झाडांमुळे धोका निर्माण झाला असल्याचे यावेळी स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

Goa Eco-Friendly Ganesha: मूर्तीकारांसाठी सावंत सरकारची मोठी घोषणा! आता प्रत्येक मातीच्या मूर्तीवर मिळणार 'इतके' अनुदान; पर्यावरण संरक्षणाचा नवा पॅटर्न

Goa Shack Policy 2026: गोव्यात सुधारित 'शॅक धोरण' लागू! समुद्रकिनाऱ्यावर डेक-बेड्स, छत्र्या ठेवण्यासाठी पर्यटन खात्याने मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT