CM Pramod Sawant | Vilas Desai  Dainik Gomantak
Video

Dudhsagar Tourism: ..आणि 'दूधसागर' हंगाम लवकर सुरु होणार! मुख्‍यमंत्र्यांची जीप ऑपरेटर्ससोबत चर्चा

Kulem News: मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍यासोबत जीप ऑपरेटर्सच्‍या मागण्‍यांसंदर्भात बैठक झाली असून, जीप वाहतुकीसाठी प्रति व्‍यक्‍ती १०० रुपये कमी करण्‍याचे आश्‍‍वासन देण्‍यात आले आहे. जीटीडीसीचा काऊन्‍टर मात्र बंद होणार नसून तो सुरूच राहील, अशीही माहिती समोर आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Dudhsagar Tourism to Resume Soon, Says MLA Ganesh Gaonkar, Vilas Desai

कुळे: दूधसागर पर्यटनाला लवकरच प्रारंभ होईल, असा विश्‍‍वास आमदार गणेश गावकर यांनी व्‍यक्‍त केला आहे. मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍यासोबत जीप ऑपरेटर्सच्‍या मागण्‍यांसंदर्भात बैठक झाली असून, जीप वाहतुकीसाठी प्रति व्‍यक्‍ती १०० रुपये कमी करण्‍याचे आश्‍‍वासन देण्‍यात आले आहे. जीटीडीसीचा काऊन्‍टर मात्र बंद होणार नसून तो सुरूच राहील, अशीही माहिती समोर आली आहे.

पर्यटन विकास महामंडळाने १९ ऑक्‍टोबरपासून दूधसागर पर्यटन हंगाम सुरू होईल, असे म्‍हटले होते. परंतु जीप चालकांच्‍या विविध मागण्‍यांमुळे त्‍याला मूर्त स्‍वरुप लाभलेले नाही. हा प्रश्‍‍न अधिक ताणून उपयोग नाही, असाही एक मतप्रवाह समोर आला होता. गुरूवारी रात्री जीटीडीसीचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्यासह माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी मंत्री दीपक पाऊस्कर आणि भाजपच्या सावर्डे मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई यांनी मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर बैठक घेतली. पर्यटन हंगाम कधी सुरू होणार याबाबतची उत्सुकता पर्यटकांत आहे. मात्र, जीप ऑपरेटर्स असोशिएशन आणि जीटीडीसीमधील वादामुळे हंगाम रखडला आहे.

घोटाळा सिद्ध करून दाखवाच!

आमदार गांवकर यांनी दावा केला की, खरा मुद्दा जीप ऑपरेटर्समध्ये जीटीडीसीच्या हस्तक्षेपाचा नाही, तो असोसिएशनच्या नवीन समितीचा आहे, जो त्यांच्या विरोधात आहे. ८ कोटींचा घोटाळा आणि शुल्क वाढीमुळे पर्यटक कमी झाल्याचे ते म्हणतात व असोसिएशन यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. जीप चालकांनी कथित घोटाळा सिद्ध करून त्या संदर्भात दक्षता तक्रार दाखल करण्याचे आव्हानही दिले.

सदस्यांशी बोलणार !

या संदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश वेळीप यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,आपण या संदर्भात सर्व सदस्यांशी बैठक घेणार व ते काय निर्णय घेतील त्यावर पुढील निर्णय अवलंबून आहे.

...तर आजपासून हंगाम सुरू!

बैठकीनंतर गणेश गावकर म्हणाले की,मुख्यमंत्र्यांनी भाजप मंडळ अध्यक्षांना जीप ऑपरेटर्सना पर्यटन हंगाम सुरू करण्यासाठी सविस्तरपणे पटवून द्यावे, असे सांगितले आहे. या संदर्भात भाजप मंडळ अध्यक्ष विलास देसाई यांनी सांगितले,की आपण दूधसागर जीप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी भेटून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या निर्णयासंदर्भात सविस्तर बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका असोसिएशनला मान्य झाली तर शुक्रवारपासून पर्यटन हंगाम सुरू होईल, असा विश्‍‍वासही त्यांनी व्‍यक्‍त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

SCROLL FOR NEXT