Chapora News  Dainik Gomantak
Video

Chapora News : शापोरा समुद्रात मासेमारी बोट उलटली; चौघांना जीवदान

Chapora : शापोरा समुद्रात मासेमारी बोट उलटली. या दुर्घटनेत बोटीवरील दोन मोटर व जाळी बोटीसमवेत पाण्‍यात बुडाली. त्यामुळे सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

शापोरा जेटीपासून समुद्रात दीड किलोमीटरच्या अंतरावर मासेमारी बोट उलटली. या बोटीवरील चौघांना दुसऱ्या एका मच्छीमारी बोटीवरील कामगारांनी वाचवले. बोटमालक चुडगो गावकर (68), कृष्णा गावकर (40), दसाराम (22) व संदीप (21) अशी वाचलेल्‍यांची नावे आहेत. यामुळे अनर्थ टळला.

सदर दुर्घटना आज गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. शिवोली येथील शापोरा नदीतून बोट अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. मासेमारी करून माघारी येताना, वादळी लाटांमुळे ती उलटली अन् काही वेळातच बुडाली. त्यापूर्वी बोटवरील चारही जणांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. हा प्रकार जवळून जाणाऱ्या अन्‍य एका मासेमारी बोटीवरील खलाशांच्या नजरेस पडला. लगेच त्‍यांनी धाव घेऊन चारही जणांना आपल्या बोटीमध्ये घेऊन बागा समुद्रकिनारी आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT