Chandor Shiva Temple Dainik Gomantak | Highest-ranked Marathi news website esakal.com
Video

Chandor Temple Restoration: चांदर येथील प्राचीन महादेव मंदिराची पुनर्बांधणीची मागणी, नंदी व इतर अवशेष पुरातत्त्व विभागाकडून जतन

Chandor Shiva Temple Restoration: चांदर या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. पूर्वी कंदब राजवटीच्या काळात त्याला चंद्रपूर असे संबोधले जात होते व कंदब राजांची ती राजधानी होती.

Sameer Panditrao

सासष्टी: चांदर या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. पूर्वी कंदब राजवटीच्या काळात त्याला चंद्रपूर असे संबोधले जात होते व कंदब राजांची ती राजधानी होती. या चांदर गावात प्राचीन महादेवाचे मंदिराचे अवशेष आहेत. काही वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने या मंदिराचे अवशेष सांभाळून काही प्रमाणात विकास केला. पण आता या मंदिराची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे, असे मागणी इतिहासकार योगेश नागवेकर यांनी आज चांदर येथील या मंदिर अवशेषाला भेट दिल्यानंतर केली.

या मंदिराचे अवशेष सापडतात त्यात नंदिकेश्वर किंवा नंदी देवाचा पुतळा आहे.१९३० साली झालेल्या उत्खननाच्या वेळी या प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले. त्यानंतर फादर हेंड्री हॅरीस यांनी आणखी उत्खनन केले व त्यांना तुघलक काळातील काही नाणी सापडली. जवळच असलेल्या विहिरीत नंदीचे मुख सापडले. फादर हॅरिस यांनी हे मुख मुंबईतील संग्रहालयात ठेवल्याची माहिती नागवेकर यांनी दिली.

मुहमद तुघलक व पोर्तुगीजांनी जे अत्याचार केले त्याची आठवण या मंदिराचे अवशेष करून देत असल्याचे नागवेकर म्हणाले. गोव्यातील कमळेश्र्वर, कपिलेश्र्वरी व तांबडी सुर्ला येथे असलेल्या महादेवाच्या मंदिराची पण हे अवशेष आठवण करून देत आहे, असे नागवेकर यांनी सांगितले.

चांदर येथील या महादेवाच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत असेही योगेश नागवेकर यांनी शेवटी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT