cashew gi tag divya rane Dainik Gomantak
Video

Goan Cashew: महिना अखेरीस गोव्याच्या काजूला मिळणार GI Tag, दिव्या राणेंनी व्यक्त केला विश्वास

GI Tag for Goan Cashew: दरवर्षी ‘काजू महोत्सव’ आयोजित करून काजू झाडे लावण्यासंदर्भात तसेच उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती होऊ लागली आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील काजूबियांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने काजूबियांच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे. दरवर्षी ‘काजू महोत्सव’ आयोजित करून काजू झाडे लावण्यासंदर्भात तसेच उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती होऊ लागली आहे.

सरकारने काजूगराला ‘जीआय टॅग’ दिल्यास बनावट काजूगर विक्रीला आळा बसू शकतो. त्याचा प्रस्ताव देऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष तथा आमदार डॉ. दिव्या राणे यांनी दिली.

काजूबियांना दरवाढ करून देण्याची मागणी कृषीमंत्र्यांकडे केल्यानंतर गेल्या तीन वर्षांनंतर ती १२० वरून १७० रुपये करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी प्रतिकिलो २०० रुपये किमतीची मागणी केली होती, त्यासाठी सरकारकडे प्रयत्न केले जातील. या दरवाढीमुळे काजूबियांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.

राज्यात जर काजू बियांचे उत्पादन वाढले तर किमतही वाढेल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना जादा मोबदला मिळण्यात होणार आहे. काजूला मार्केटमध्ये चांगला दर मिळू शकतो, असेही डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT