pooja naik job scam, property seized pooja naik, cm pramod sawant statement Dainik Gomantak
Video

Pooja Naik: कॅश फॉर जॉब; लक्झरी लायफा खातीर 'त्या' 17 कोटींचो वापर Watch Video

Cash For Job: मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, पूजा नाईक हिने सुमारे १७ कोटींची मालमत्ता गोळा केल्याचा दावा केला होता.

Sameer Panditrao

पणजी: नोकरीच्या काळ्याबाजारप्रकरणी पूजा नाईक हिची संपत्ती जप्त केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तिच्या संपत्तीच्या पैशांतून फसवणूक झालेल्यांना पैसे परत करण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले.

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी याविषयीचा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, कॅश-फॉर-जॉब घोटाळ्यात पूजा नाईक ही मुख्य संशयित असून सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाच्या तपासात सरकारी नोकरीच्या इच्छुकांकडून गोळा करण्यात आलेल्या मोठ्या रकमेचा गैरवापर झाल्याचे उघड झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, पूजा नाईक हिने सुमारे १७ कोटींची मालमत्ता गोळा केल्याचा दावा केला होता. मात्र तपासात ही संपूर्ण रक्कम तिने ऐषआरामी जीवनशैलीवर खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे.पूजाचे आलिशान राहणीमान, संपत्तीचा साठा, महागड्या गाड्या, विविध मालमत्ता, तसेच वारंवार केलेले परदेश दौरे हे त्याचे पुरावे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सरदेसाई यांनी आरोपपत्रे व अंतर्गत चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली. पूजाच मुख्य की तिचा कोणी बोलवता धनी आहे, असे विचारून२६ लाखांचा तपास लागला तर पूजाचे इतर पैसे कुठे गेले याचा हिशेब तपास यंत्रणा कधी घेणार,असा प्रश्न त्यांनी केला.

४.४० कोटींची मालमत्ता जप्त

या प्रकरणात आरोपीकडील ४.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती देत मुख्यमंत्री म्हणाले की, ‘जप्त केलेली मालमत्ता घोटाळ्यात फसवणूक झालेल्या पीडितांना परतफेड करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. याबाबत न्यायालयीन आदेशांची प्रतीक्षा आहे.’ सभागृहात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत एकूण ५१ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी २०२४ मध्ये ४० आणि २०२५ मध्ये ११ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: आधी प्रेम, मग अनन्वित अत्याचार अन् शेवटी गळा चिरला, रशियन सिरीयल किलरच्या क्रूरतेनं हादरला गोवा; लवकरच उलघडणार 10 तरुणींच्या मृत्यूचं गूढ?

Congress MLA: "सुंदर मुलगी दिसली की मन भटकतं अन् अत्याचर होतो..." काँग्रेस आमदारानं तोडले अकलेचे तारे; घृणास्पद वक्तव्यावर भाजप आक्रमक VIDEO

अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा! डॉल्बी ऑडिओमधील तांत्रिक बिघाडानं उडाली खळबळ; केंद्र सरकारकडून नवीन चेतावणी जारी

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

SCROLL FOR NEXT