Caranzalem Fire News Dainik Gomantak
Video

Caranzalem Fire News: गवताला लागलेल्या आगीमुळे 3 बोटी जळून खाक, करंझाळे येथील घटना

Caranzalem Fire Incident: करंझाळे - मिरामार येथील किनारपट्टीवर गेल्या अनेक दिवसांपासून या पाच बोटी पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या.

Sameer Panditrao

Caranzalem coastal area fire burns three boats

पणजी: करंझाळे येथील किनारपट्टी परिसरात आज दुपारी गवताला लागलेल्या आगीची झळ तेथे उभ्या करून ठेवलेल्या मच्छीमारी बोटींना बसली. तेथील पाच लाकडी बोटींपैकी तीन जळून खाक झाल्या, तर अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे दोन बोटी वाचवण्यात यश आले. ही आग कशी लागली याची माहिती नसल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. या आगीमागे घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

करंझाळे - मिरामार येथील किनारपट्टीवर गेल्या अनेक दिवसांपासून या पाच बोटी पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या. आज दुपारी तेथील गवताला आग लागली व काही क्षणात ही आग पार्क करून ठेवलेल्या लाकडी बोटींपर्यंत पोहचली. या आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्‍या नियंत्रण कक्षाला दुपारी ४ च्या सुमारास देण्यात आल्यावर पाण्याचे बंब त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी लागलीच पाण्याची फवारणी व फोम वापरून ही आग विझवली. मात्र, तोपर्यंत तीन बोटी आगीत खाक झाल्या. या प्रकरणी पणजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, या बोटींच्या मालकाने त्याला तक्रार द्यायची नसल्याचे सांगितले अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली. या बोटी जीर्णावस्थेत असल्याने त्या तेथील झाडाझुडपात उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT