Car Plunges Into Mandovi River Accident Dainik Gomantak
Video

Mandovi Accident: झोपेत टाकला रिव्हर्स गियर अन गाडी थेट नदीत! फेरीबोट कर्मचाऱ्यांनी वाचवला जीव; दिवाडी- पणजी येथील घटना

Divar Ferry Car Accident: दिवाडी येथील फेरी धक्क्यावर शनिवारी सकाळी पहाटे तीनच्या सुमारास कारचालकाची डुलकी लागली आणि त्याच स्थितीत गाडीचा रिव्हर्स गियर पडल्याने कार थेट मांडवी नदीत गेली.

Sameer Panditrao

Car Plunges Into Mandovi River Divar Ferry Accident News

पणजी: दिवाडी येथील फेरी धक्क्यावर शनिवारी सकाळी पहाटे तीनच्या सुमारास कारचालकाची डुलकी लागली आणि त्याच स्थितीत गाडीचा रिव्हर्स गियर पडल्याने कार थेट मांडवी नदीत गेली. कार पाण्यात गेल्याचे समजताच बाजूला असलेल्या फेरीबोटीमधील कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट आणि रेस्क्यू ट्यूब टाकून चालकाला बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाडी फेरी धक्क्यावर ही घटना घडली. शर्मद शैलेश शिरोडकर हा आपल्या ‘मारुती इग्नीस’ या कारमध्ये बसला होता; परंतु त्याला अचानक झोप अनावर झाली आणि त्याने त्याच स्थितीत धक्क्यावर फेरीबोट असावी, या अंदाजाने रिव्हर्स गियर टाकला अन् कार थेट पाण्यात गेली. पाण्यात पडल्यानंतर शर्मदची झोपच उडाली आणि दार उघडून त्याने आरडाओरडा केला. हा प्रकार फेरी धक्क्यावरील फेरीबोट कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी लाईफ जॅकेटआणि रेस्क्यू ट्यूब चालकाच्या दिशेने फेकली. त्याच्या आधारे तो पाण्यातून बाहेर आला.

पहाटे सुमारे ३ वाजता जुने गोवे येथील अग्निशामक दलाला तसेच पणजी आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यालयाला या घटनेची माहिती मिळाली. अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाण्यात पडलेली कार बाहेर काढली.

आपत्ती व्यवस्थापन पथकात समीर हजारे, सुरेंद्र कारबोटकर, संदीप नाईक, राजेंद्र पेडणेकर, तसेच जुने गोवे अग्निशामक दलाच्या जवानांचा सहभाग होता. जुने गोवे पोलिस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Shami: ‘मी क्रिकेट सोडून देईन!’… मोहम्मद शमी जेव्हा निवृत्ती घेणार होता, भरत अरुण यांचा मोठा खुलासा

Shaktipeeth Expressway: कोल्हापूरला वगळलं; शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनासाठी सरकारकडून आदेश जारी

Monthly Numerology Prediction September 2025: सप्टेंबर महिन्यात मूलांक 1 ते 7 पर्यंतच्या लोकांचे नशीब उजळणार, मोठा धनलाभ होणार; मान-सन्मान वाढणार!

गोव्याच्या गणेशोत्सवात रमली अभिनेत्री समीरा रेड्डी; फोटो शेअर करत म्हणाली, 'ही नवी सुरुवात...'

Viral Video: अटारी बॉर्डरवर पाकड्यांची 'पोलखोल'! पाकिस्तानच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य, तर भारताची बाजू स्वच्छ; पावसाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT