Candolim Fire News Dainik Gomantak
Video

Candolim Fire News: कांदोळीतील दुकानात घरगुती सिलिंडरचा स्फोट, आगीत लाखो रुपयांचे नुकसान; दाम्पत्य जखमी

Candolim Fire Incident: दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी पिळर्ण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दुकानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवत दुकानातील रिकामे सिलिंडर बाहेर काढले.

Sameer Panditrao

कळंगुट: ओर्डा -कांदोळी येथील एका किराणा मालाच्या दुकानात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. या दुर्घटनेत दुकानमालक लॉरेन्स परैरा आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाल्याची माहिती पिळर्ण येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. जखमी दाम्पत्यावर सध्या कांदोळीतील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.

सकाळी साडेअकराच्या सुमारास दुकानातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने परिसरात हाहाकार उडाला. नेमके काय घडले याची माहिती मिळत नसल्याने परिसरातील लोक घाबरले. या प्रकाराची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी पिळर्ण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दुकानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवत दुकानातील रिकामे सिलिंडर बाहेर काढले. यावेळी पिळर्ण अग्निशमन दलाच्या मदतीला म्हापसा तसेच पर्वरी येथून अग्निशमन दलाचे बंब तात्काळ दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे सोपे झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

SCROLL FOR NEXT