Goa accident news  Dainik Gomantak
Video

Calangute Accident: भरधाव वेगाने आला आणि बसला धडकला; कळंगूटमधील अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू

Calangute News: या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सध्या या घटनेचा पुढील तपास सुरु आहे

Akshata Chhatre

कळंगुट: गोव्यात अपघातांचे प्रमाण काही कमी होणायचे नाव घेत नाही. शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) रोजी सकाळी एका खासगी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराने प्राण गमावला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सध्या या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

शनिवारी सकाळी ८-८:३० वाजताच्या सुमारास दुचाकी आणि एका खासगी बसमध्ये हा अपघात घडला. कलंगुट समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या जंक्शनवर हा अपघात झाल्याने शहरात हळहळ पसरली आहे. समुद्रकिनाऱ्याकडून येणाऱ्या रस्त्यावरून एक दुचाकी अतिशय भरधाव वेगाने येत होती आणि त्याच्याच थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या खासगी बसला तिने धडक दिली. समोरून येणारी ही बस दररोजच्या वेळेप्रमाणे बसस्टॉपच्या दिशेने जात होती. समोरून वेगेने येणाऱ्या दुचाकी चालकाला वाचवण्यासाठी बस थांबवली मात्र दुचाकी चालकाचा वेग प्रचंड असल्याने तो बसला धडकला आणि थेट शेजारी असलेल्या लाईटच्या खांबाला आपटला आणि गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी वेळीच त्याला उपचारांसंसाठी पाठवले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

गोव्यातील एका खासगी बसला धडक दिलेली ही गाडी कर्नाटकमधली असून मृत दुचाकीचालक बंगळूर येथील असल्याची शक्यात आहे. सध्या कलंगुट पोलीस या अपघाताचा तपास करत असून बस चालकाला चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT