Borim Bridge Dainik Gomantak
Video

Borim Bridge: बोरी पुलावरील वाहतुकीस अखेर प्रारंभ Video

Borim Bridge Road Update: फोंडा आणि मडगाव जोडणाऱ्या दक्षिण गोव्यातील महत्त्वाच्या ठरलेल्या बोरी पुलावरील रस्ताकाम सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली.

Sameer Panditrao

फोंडा: फोंडा आणि मडगाव जोडणाऱ्या दक्षिण गोव्यातील महत्त्वाच्या ठरलेल्या बोरी पुलावरील रस्ताकाम सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. हा पूल दुरुस्तीसाठी रविवारी ८ रोजी रात्री आठ ते सोमवार, ९ रोजी सकाळी आठपर्यंत वाहतुकीस बंद राहिल, असे जाहीर केले होते, पण नियोजित वेळेपूर्वीच काम पूर्ण झाल्यामुळे वाहतूक सुरू करण्यात आली.

पुलाच्या रस्ते दुरुस्तीसाठी मुंबई येथून खास ‘पॉलिमर मोडिफाय हॉटमिक्स’ डांबर आणण्यात आले होते, हे काम रात्री सुरू केल्यानंतर अडथळ्याविना पूर्ण करण्यात आल्याची माहिती साबांखाचे सहायक अभियंता आनंद वाघुर्मेकर यांनी दिली. बोरी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्यानंतर दुर्भाट - रासई तसेच राशोल - शिरोडा जलमार्गावर फेरीबोटींची संख्या वाढवली होती, रात्रभर ही वाहतूक सुरू होती. काहींनी मडगावहून फोंडा गाठण्यासाठी पणजी मार्गाचा अवलंब केला. पोलिस, नदी परवहन खात्याने उत्तम सहकार्य दिल्याचे आनंद वाघुर्मेकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT