Bicholim Theft Dainik Gomantak
Video

Bicholim Theft: डिचोलीतील आजाद जामा मशिदीत चोरी, दानपेटी फोडली, चोरटा सीसीटीव्हीत कैद

Jama Masjid Bicholim Theft: मुख्य रस्त्यानजीक भर लोकवस्तीत असलेल्या या मशिदीत चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. मशीद समितीने डिचोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Sameer Panditrao

Theft at Azad Jama Masjid Bicholim

डिचोली: येथील मुस्लिमवाडा येथील आझाद जामा मशिदीत चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने मशिदीतील दानपेटी फोडून त्यातील पैसे लंपास केले. संशयित मशिदीत चोरी करतानाचे दृष्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

मुख्य रस्त्यानजीक भर लोकवस्तीत असलेल्या या मशिदीत चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. मशीद समितीने डिचोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास चालवला आहे. चोरटा लवकरच जाळ्यात अडकणार, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तिशीतील एक संशयित युवक सहजरीत्या मशिदीत शिरतो व तिथे कोणीच नसल्याची खात्री पटल्यानंतर दानपेटी फोडून पैशावर डल्ला मारून पळ काढतो, असे दृष्य सीसीटिव्हीत कैद झाले आहे. फुटेजवरून हा चोरटा परप्रांतीय असावा, असा संशय मशीद समितीचे अध्यक्ष नझीर बेग, सचिव बालाखान गोरी, मुस्ताफा बेग आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. चोरट्याने दानपेटीतील नेमकी किती रक्कम लंपास केली, ते निश्चित समजू शकले नाही. मात्र हा आकडा २० हजाराहून अधिक असणार, असा अंदाज समितीने व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT