Bicholim News Dainik Gomantak
Video

Chess Competition: डिचोली येथे महिलांसाठी बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन, स्नेहल नाईक ठरली ‘बुद्धिबळ क्वीन’

Bicholim Chess Competition: महिलादिनाचे औचित्य साधून आदिनाथ अकादमी, इनरव्हील क्‍लबच्या सहकार्याने नाईकनगर-बोर्डे येथील श्री सिद्धिविनायक देवस्थानतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Sameer Panditrao

डिचोली: येथे आयोजित महिला बुद्धिबळ स्पर्धेत स्नेहल नाईक ही ‘बुद्धिबळ क्वीन’ मुकुटाची मानकरी ठरली. उदया किशोर शेट्ये हिला उपविजेतेपद प्राप्त झाले. प्रशिला म्हापसेकर हिला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून आदिनाथ अकादमी आणि इनरव्हील क्‍लबच्या सहकार्याने नाईकनगर-बोर्डे येथील श्री सिद्धिविनायक देवस्थानतर्फे आज रविवारी (ता. ९) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, तसेच नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, नगरसेवक नीलेश टोपले आणि दीपा शिरगावकर, डिचोली बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष राजन कडकडे, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, स्वप्‍निल दीक्षित, नीलेश धारगळकर, डॉ. ज्योती सावंत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

कर्तृत्‍ववान महिलांचा सत्कार

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठ महिला जनी भागू ताटे, निवृत्त शिक्षिका शुभांगी बांदेकर, राधाबाई तेलंग, मधुरा मांद्रेकर, रती गावडे यांचा सत्कार करण्यात आला. उज्‍ज्वला आचार्य यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. बादलीत बाटली टाकणे स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन नारायण बेतकीकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Kundra: ''माझी एक किडणी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

SCROLL FOR NEXT