Banyan Tree Collapse at Rumad Pale Dainik Gomantak
Video

Rumad Pale: मुसळधार पावसात रुमड येथे वडाचे झाड कोसळले, मालमत्तेचे नुकसान

Banyan Tree Collapse at Rumad Pale: रूमड - पाळीत पहाटे चारच्या सुमारास शंभर वर्षे जुना वटवृक्ष कोसळल्यामुळे या दोन कारगाड्या, दोन दुचाक्यांसहीत दोन घरांचे नुकसान झाले.

Sameer Panditrao

फोंडा : रूमड - पाळीत पहाटे चारच्या सुमारास शंभर वर्षे जुना वटवृक्ष कोसळल्यामुळे या दोन कारगाड्या, दोन दुचाक्यांसहीत दोन घरांचे नुकसान झाले. साधारण पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा वटवृक्ष दिवसा कोसळला असता तर जीवितहानी होण्याचा धोका होता, तो टळला.

हा वटवृक्ष फार जुनाट असून बाजूला घरे आहेत. या ठिकाणी वाहने पार्क केली जातात. काल रात्री येथील नागरिकांनी आपली वाहने पार्क केली होती, मात्र पहाटे भला मोठा आवाज झाला त्यावेळी सर्वजण घराबाहेर धावून आले. या भला मोठा वटवृक्ष कारगाड्या तसेच दुचाक्यांवर कोसळला.

स्थानिक पंचसदस्य प्रसाद सावंत यांनी त्यानंतर लगेच अग्निशामक दलाशी संपर्क साधल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन वटवृक्ष बाजूला करण्याच्या कामाला सुरवात केली. दरम्यान, पाळी पंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी धोकादायक झाडे असून ही झाडे केव्हाही कोसळण्याचा धोका आहे, त्यामुळे अग्निशामक दल तसेच आपत्तीनिवारण कक्षाने यासंबंधी त्वरित दखल घेऊन अशी झाडे दूर करवीत, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT