Baga beach viral video Dainik Gomantak
Video

Goa Shocking Video: बागा येथील 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ, आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारला धरले धारेवर

Baga beach viral video: अत्यंत गजबजलेल्या बागा समुद्रकिनाऱ्यावरील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: अत्यंत गजबजलेल्या बागा समुद्रकिनाऱ्यावरील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या व्हिडिओमध्ये एक विदेशी महिला भररस्त्यात पर्यटकांना देहविक्रीसाठी उघडपणे प्रवृत्त करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी भाजप सरकार आणि पोलिस प्रशासनावर घणाघाती टीका केली आहे.

संबंधित व्हिडिओमध्ये कथित विदेशी महिला ग्राहकांशी इंग्रजीमध्ये संवाद साधत असून दर आणि पैशांच्या देवाणघेवाणीबाबत बोलणी करताना दिसत आहे. यावेळी संबंधित ग्राहकांच्या हातात दारूच्या बाटल्या देखील दिसताहेत.

पर्यटनाच्या नावाखाली चालणाऱ्या या ‘शॉकिंग’ प्रकारामुळे आता स्थानिकांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलून कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

‘संबंधितांवर कठोर कारवाई करा’

आमदार सरदेसाई यांनी हा व्हिडिओ शेअर करत असा आरोप केला की, गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून पोलिसांच्या नाकाखाली असे अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. ‘बागासारख्या प्रमुख पर्यटन स्थळावर जर असे प्रकार घडत असतील, तर गोव्याची ‘कौटुंबिक पर्यटन स्थळ’ ही ओळख कायमची पुसली जाईल,’ असे त्यांनी नमूद केले. या कृत्यामुळे गोव्याच्या जागतिक लौकिकाला तडा जात असल्याची भीती व्यक्त करत, गृह विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa North: न्याय देत नसाल तर विष द्या ! पळसकट्टा, येथील धनगर समाज महिलांचा प्रकल्पाविरोधात संताप

Mandovi River: चोडण येथील बांध कोसळतोय! दुरुस्तीची मागणी,'मांडवी'चे पाणी फुटण्याचा धोका

Goa Weather Update: गोव्याला अवकाळी पावसाने झोडपले! उकाड्यापासून सुटका, वातावरणात पसरला गारवा

Bicholim Fire: डिचोलीत भरदिवसा फ्लॅटला आग; जीवितहानी टळली, दागिन्यांसह पंधरा लाखांचा ऐवज भस्मसात

Baina Fish Market: बायणा मासळी मार्केटची दुरवस्था; घाऊक विक्रेत्यांना हलवण्याच्या हालचालींवर स्थानिकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT