illegal gambling Goa Dainik Gomantak
Video

रमेश तवडकर म्हणतात, "गेल्या दोन वर्षांत 90 टक्के जुगार बंद केला, पुन्हा कसा सुरू झाला माहीत नाही!"

Goa Gambling Issue: या प्रकरणाचा कोणताही राजकीय संबंध नाही, असेही रमेश तवडकर यांनी जोर देऊन सांगितले

Akshata Chhatre

पणजी: काणकोणमधील जुगार प्रकरणांमध्ये झालेल्या अटकेसंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गोवा विधानसभेचे अध्यक्ष आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "जुगारामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होताना आपण पाहिले आहे आणि म्हणूनच आम्ही जुगारावर कठोर कारवाई केली." गेल्या दोन वर्षांत जवळजवळ ९० टक्के जुगाराचे उपक्रम बंद करण्यात यश आले होते, असे तवडकर यांनी सांगितले. मात्र, ते पुन्हा कसे सुरू झाले, हे त्यांना माहीत नसल्याचे त्यांनी नमूद केले. अलीकडील जुगार प्रकरणात कारवारमधील लोक तसेच काही स्थानिक लोकांचा सहभाग होता, परंतु दक्षिण गोव्याच्या एसपींनी तो उघडकीस आणला. या प्रकरणाचा कोणताही राजकीय संबंध नाही, असेही रमेश तवडकर यांनी जोर देऊन सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'जे गोव्यात परतले, त्‍यांचीही पर्यटक म्‍हणून नोंद'! लोबोंचा ‘घरचा आहेर’; पर्यटनमंत्र्यांनी दिला बदनामी न करण्याचा सल्ला

Goa GMC: 'गोमेकॉ'मध्ये आणताना 88 रुग्‍ण दगावले! विधानसभेत आरोग्‍यमंत्र्यांच्या उत्तरातून माहिती समोर

Goa Police: 'गोवा पोलिस सर्वात खराब, कोलवा बीचवर मला भीती दाखवून 2,000 लाच घेतली'; पोलिसांवर गंभीर आरोप

Dog Attack: बोगमाळोत कुत्र्याने घेतला पादचाऱ्याचा चावा, रहिवाशाविरुद्ध वास्को पोलिसांत गुन्हा दाखल

Parra: 'आमच्यावरील गुन्हे मागे घ्या'! भूमिका, साखळेश्वर देवस्थान वाद; पर्येतील शेकडो नागरिकांची पोलिस स्थानकावर धडक

SCROLL FOR NEXT