Arambol Beach Demolition Dainik Gomantak
Video

Arambol: हरमल किनारी 9 बांधकामे पाडली, ‘सीआरझेड’चे उल्लंघन; बीडीओ कार्यालयाकडून कारवाई

Arambol Illegal Construction Demolition: हरमल समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणात सीआरझेड विभागाचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या केलेली बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: हरमल समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणात सीआरझेड विभागाचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या केलेली बांधकामे पाडण्यास सध्या सुरुवात झाली आहे. २१६ बांधकामापैकी ९ बांधकामे काल व आज (बुधवारी) पाडण्यात आली.

मागच्या वर्षापासून हरमल समुद्रकिनारी भागात गिरकर वाड्यावरील परिसरातील बेकायदेशीर बांधकामाविषयी ही प्रकरणे न्यायालयात पोचली होती. त्यावेळी सरपंच म्हणून बर्नाड फर्नांडिस हे असताना या बांधकामांविषयी उच्च न्यायालयाने ही गंभीर दखल घेत सरपंचांच्या नातेवाईकासहित इतर कोणकोणती बांधकामे बेकायदेशीरपणे उभारली गेली, त्या सर्व बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार एकूण २१६ बांधकामावर कारवाईचे संकेत प्राप्त झाल्यानंतर सध्या पेडणे मामलदार पेडणे गट विकास कार्यालयामार्फत बांधकामावर हातोडा टाकण्याचे काम सुरू झाले.

हरमल किनारी भागातील जॉर्ज डिसोझा ,अवेलिनो फर्नांडिस व इतरांची बांधकामे मोडून टाकली. उपसरपंच सोनाली माज्जी यांच्याकडे संपर्क साधला असता कालपासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम पाडण्यास सुरुवात केली होती. काल आणि आज मिळून नऊ बांधकामे हटवण्याचे त्यांनी सांगितले.

हरमल गिरकर वाड्यावरील समुद्रकिनारी भागात बेकायदेशीर उभारलेल्या बांधकामावर चार आणि पाच या दोन दिवसांमध्ये एकूण नऊ बांधकामावर कारवाई करण्यात आली.

सी आर झेड विभागाचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे मांद्रे मतदार संघातील कीनारी भागात करण्यात आली होती. या संदर्भात विभागाकडे तक्रारी केल्यानंतर याची दखल न्यायालयाने घेऊन ही बांधकामे मोडण्याचा आदेश दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

SCROLL FOR NEXT