Goya Night Club Anjuna Dainik Gomantak
Video

Goya Night Club: गोंया नायटक्लब मातयेभरवण आदेश

Goya Night club Anjuna: शेतजमिनीचा विनापरवाना व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी हणजूण येथील वादग्रस्त ‘गोंया’ नाईट क्लबला बार्देश उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Sameer Panditrao

म्हापसा: शेतजमिनीचा विनापरवाना व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी हणजूण येथील वादग्रस्त ‘गोंया’ नाईट क्लबला बार्देश उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ती जमीन पुन्हा मूळ स्थितीत आणण्याचे आदेश क्लब व्यवस्थापनाला दिले आहेत. हा बेकायदा नाईट क्लब सुमारे अडीच हजार चौरस मीटर क्षेत्रफळ शेतजमिनीत उभारण्यात आला आहे. दरम्यान, या आदेशाला प्रशासकीय लवादाकडे आव्हान देण्यात आले आहे.

तपासणीत ‘गोंया’ क्लब हा मूळ शेतजमिनीत बेकायदेशीर उभारल्याचे आढळून आले. अग्निसुरक्षा परवानासुद्धा नसल्याने तत्काळ तो सील करण्यात आला. बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात आदेश देत क्लब व्यवस्थापनाला आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत जमीन पुन्हा तिच्या मूळ शेतीयोग्य स्थितीत आणण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय शेतजमिनीचा विनापरवाना व्यावसायिक वापर केल्याबद्दल १५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. हा आदेश १६ डिसेंबर २०२५ रोजी खुल्या न्यायालयात सुनावण्यात आला. दरम्यान, दिलेल्या मुदतीत जमीन मूळ स्‍थितीत न आणल्‍यास मामलेदार आदेश अमलात आणतील आणि त्यासाठी येणारा खर्च क्‍लबकडून वसूल केला जाईल, असेही आदेशात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT