ALEIXO REGINALDO LOURENCO  Dainik Gomantak
Video

Curtorim: कुडतरी मतदारसंघातील रस्त्याचे काम डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण; आलेक्स रेजिनाल्ड

Curtorim Road Work: मतदारसंघातील रस्त्यांची दुरुस्ती व हॉटमिक्स डांबरीकरण होणार आहे, असे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आज मडगावात पत्रकारांशी संवाद साधला व वरील निवेदन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Aleixo Reginaldo About Curtorim Road

सासष्टी: आपले काही विरोधक लोकांची दिशाभूल करीत आहेत. आपल्या विरोधात लोकांमध्ये विष कालवण्यासाठी त्यांना इतर काही विषय मिळत नसल्याने ते रस्त्याचा विषय पुढे करतात. मात्र, कुडतरी मतदारसंघातील रस्त्यांची दुरुस्ती व हॉटमिक्सिंगसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच या मतदारसंघातील रस्त्यांची दुरुस्ती व हॉटमिक्स डांबरीकरण होणार आहे, असे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आज मडगावात पत्रकारांशी संवाद साधला व वरील निवेदन केले.

पावसाळ्यामुळे हे काम लांबले होते, पण त्यासाठी आपण प्रशासकीय, आर्थिक परवानगी मिळवली आहे. कामाचा आदेशसुद्धा देण्यात आला आहे. लोकांनी आणखी काही दिवस कळ सोसावी. त्याचप्रमाणे वीज खात्याची भूमिगत वाहिनी घालण्याचे काम तसेच अदानी गॅस एजन्सीच्या अपूर्ण राहिलेल्या कामामुळे रस्त्याची दुरुस्ती करता येत नाही. आपण वीज खात्याला तसेच अदानी गॅस एजन्सीला त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे. एकदा रस्त्याची दुरुस्ती व हॉटमिक्सिंग झाल्यानंतर आपण रस्ते खोदण्यास देणार नाही, असेही आलेक्स रेजिनाल्ड यांनी स्पष्ट केले.

हाऊसिंग बोर्ड येथील रस्त्यांची दुरुस्ती व हॉटमिक्सिंगचे कामसुद्धा या दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT