Ake Marago  Dainik Gomantak
Video

Margao: आके येथील साईबाबा मुर्ती प्रतिष्ठापना रौप्यमहोत्सव सोहळा; मुख्यमंत्री सावंत यांचा होणार गौरव

Ake Marago : ट्रस्टतर्फे देण्यात येणारा पहिला श्री साई सेवा सन्मान पुरस्कार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: तळेबांध, आके येथील साईनाथ प्रार्थना समाज ट्रस्टच्या साईधाम श्री साईबाबा मंदिरात शनिवार ५ रोजी संध्याकाळी ५ वाजता कै. महेश राजाध्यक्ष ट्रस्टचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. यावेळी ट्रस्टतर्फे देण्यात येणारा पहिला श्री साई सेवा सन्मान पुरस्कार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे,‌ आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, कै. आबाजी पणशीकर यांचे मानसपुत्र श्री शाहू महाराज शिंदे उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी ५ रोजी रात्री ८.३० वाजता सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायक पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यांना संवादिनीवर राया कोरगावकर, तबल्यावर दयानिधेश कोसंबे, पखवाजवर दत्तराज शेट्ये व मंजिरीवर राहुल खांडोळकर साथ संगत करणार आहेत. डॉ. गोविंद भगत कार्यक्रमात निवेदन करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दाट धुक्यामुळे अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन दरीच्या टोकावर थांबला; दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले

Goa Assembly Live: मुद्रण आणि स्टेशनरी विभागांतर्गत 5 डिजिटल उपक्रम सुरू

Amazon-Flipkart Sale: स्मार्टफोन्सपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत... ऑफर्स, डिस्काऊंट आणि बरंच काही; ॲमेझॉन-फ्लिपकार्टच्या 'फ्रीडम सेल'चं बिगुल वाजलं!

Surya Grahan Astrology: 2 ऑगस्टला सूर्य ग्रहण पाळावं का? हिंदू पंचांगात दिलेली माहिती वाचा; ग्रहणाचे नियम व अटी जाणून घ्या

RORO Ferry Service: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर! लवकरच सुरु होतेय मुंबई-सिंधुदुर्ग 'रो-रो'सेवा; किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT