Ajit Malkarnekar Talk Tablre Dainik Gomantak
Video

Goa: 'गोव्यात गावागावांत गवे, हत्ती दिसतात, याला आपणच जबाबदार'! मळकर्णेकरांचे परखड मत

Ajit Malkarnekar About Goa: अजित मळकर्णेकर यांनी सांगितले की, १९६० पूर्वी गावात माकडेही दिसत नव्हती. जंगलात बाराही महिने झाडांना वेगवेगळ्या हंगामात फळे येत होती.

Sameer Panditrao

पणजी: आज माकड, गवे, हत्ती गावागावांत दिसतात, यासाठी आपणच जबाबदार आहोत. हे समजून घेण्यासाठी ६० वर्षांपूर्वी काय घडले ते पाहावे लागेल, असे परखड मत पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी अजित मळकर्णेकर यांनी व्यक्त केले.

‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘टेबल टॉक’ कार्यक्रमात बोलताना मळकर्णेकर यांनी विकासाच्या संकल्पना, शेतीवरील संकटे, जंगलाच्या नष्ट होत चाललेल्या परिसंस्था आणि शिक्षण पद्धतीतील त्रुटींवर स्पष्ट आणि अनुभवसिद्ध भाष्य केले.

अजित मळकर्णेकर यांनी सांगितले की, १९६० पूर्वी गावात माकडेही दिसत नव्हती. जंगलात बाराही महिने झाडांना वेगवेगळ्या हंगामात फळे येत होती. ती झाडे नष्ट झाल्याने आज जंगली जनावरे गावात अन्नाच्या शोधात फिरतात. जंगलातील नैसर्गिक ‘सप्लाय चेन’ नष्ट झाल्याचा हा परिणाम आहे. विकास पुरुष होण्याच्या शर्यतीत लोकांनी जंगले साफ केली, झाडे तोडली, खाणीत हजारो एकर जमीन उद्‌ध्वस्त केली; पण त्यावर झाडे पुन्हा लावली नाहीत. परिणामी आज माकडे माणसांच्या शेजारी आणि बिबटे गावात दिसतात यासाठी केवळ आपण जबाबदार आहोत.

मळकर्णेकर म्हणाले, एकदा एका पेपर फॅक्टरीला जंगल तोडण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे आदिवासींचे जीवनच बदलले. तिथे काम करत असतानाच माझी जर्मन महिलेशी ओळख झाली आणि तिच्या निमंत्रणावरून मी जर्मनीला गेलो.

शेतीसाठी गोव्यात परतलो

दहा वर्षे जर्मनीत राहून भाषा आणि शिक्षण घेतले; परंतु मुळाशी जोडलेले नाते जपण्यासाठी मी गोव्यात परत आलो. अंक-दाभाळ येथे जंगलाच्या कडेला एक जमीन घेतली. दाभाळला आलो तेव्हा मुलगा फक्त ८ वर्षांचा होता.

त्या वेळेस आईने विरोध केला; पण मी त्याच जमिनीत विहीर खणली. मला एक वर्षानंतर तिथे वीज मिळाली. जमिनीचे विशेष म्हणजे आजपर्यंत त्या जमिनीत मी कधीही रासायनिक खतांचा वापर केलेला नाही.

जंगलांचे ऑडिट आवश्यक

आज वनस्पतीशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंगलात जाऊन झाडे लावण्याची संधी मिळायला हवी. त्यासाठी जंगलातील साखळी समजून घेण्यासाठी जंगलांचे ऑडिट होणे गरजेचे आहे. ऑडिट झाले तर जंगलात कोणती झाडे आहेत, कोणती जनावरे आहेत याची सर्व माहिती उपलब्ध होईल आणि आपण त्यावर काम तरी शकतो, असे मळकर्णेकर यांनी सुचवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात धर्मांतरविरोधी कठोर कायदा करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी

Government Employees: वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सरकारी कर्मचारी घेऊ शकतात 30 दिवसांची रजा, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टच सांगितलं

Viral Video: नवा जुगाड, नवा व्हिडिओ! सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्हीही म्हणाल, 'क्या बात है!'

'म्हादई आमची लढाई, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही'; प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यानंतर DK शिवकुमारांचा इशारा

August 2025 Horoscope: मेष ते मीन... ऑगस्टमध्ये 'या' 5 राशींच्या कुंडलीत अशुभ योग, खर्च आणि तणावात वाढ!

SCROLL FOR NEXT