Ravi Naik on Agriculture Policy Dainik Gomantak
Video

Ravi Naik: 'कृषी धोरणा'ला लवकरच मंजुरी! शेतकऱयांचे हित जपणार असल्याची मंत्री नाईक यांची ग्वाही

Agriculture Policy: गोव्यासाठीचा कृषी धोरणाचा आराखडा तयार केला असून त्याची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. या धोरणाच्या आराखड्यावर मंत्रीमंडळात चर्चा होईल व सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर धोरणाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असे कृषिमंत्री रवी नाईक यानी मडगावात सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Minister Ravi Naik About Agriculture Policy

सासष्टी: गोव्यासाठीचा कृषी धोरणाचा आराखडा तयार केला असून त्याची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. या धोरणाच्या आराखड्यावर मंत्रीमंडळात चर्चा होईल व सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर धोरणाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असे कृषिमंत्री रवी नाईक यानी मडगावात सांगितले. आम्ही हे धोरण शेतकऱ्यांचे हीत जपुनच तयार केले आहे. या धोरणात अशा बाबी आहेत जेणेकरुन जास्तीत जास्त युवक कृषी क्षेत्राकडे वळतील याची खात्री आपल्याला आहे असेही मंत्र्यानी सांगितले.

गोवा हे लहान राज्य असून आम्ही आमच्या जमीनीचे रक्षण केले पाहिजे. ही जमीन पुढील पिढीसाठी राखून ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले. आता मुंबई व दिल्लीतील लोक गोव्यात जमिनी विकत घेण्यासाठी येत आहेत. गोमंतकीयांनी आपल्या जमिनी विकू नये असे आपण आवाहन करीत आहे असेही मंत्री नाईक यानी सांगितले. आम्ही बांधकामांवर सुद्धा नियंत्रण आणले पाहिजे. जर परिस्थिती अशीच राहिली तर गोव्याच्या पर्यावरणीय समतोल बिघडेल, असेही त्यांनी सांगितले.आज मडगावच्या रवींद्र भवनात रास्त भावाच्या दुकानदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT