AAP Geetesh Warrant Dainik Gomantak
Video

AAP Geetesh Warrant: गीतेशला हात लावूनच दाखवा! 'आप' नेत्यांचे आव्हान

Goa Politics: ‘आप’चे फोंड्यातील उमेदवार गीतेश नाईक यांच्याविरूद्ध वॉरंट बजावणे म्हणजे आम आदमी पक्षाचे आणि उमेदवाराचे खच्चीकरण करण्याचा डाव सत्ताधारी भाजप आणि या पक्षाचा मित्र असलेल्या काँग्रेसने केला.

Sameer Amunekar

फोंडा: ‘आप’चे फोंड्यातील उमेदवार गीतेश नाईक यांच्याविरूद्ध वॉरंट बजावणे म्हणजे आम आदमी पक्षाचे आणि उमेदवाराचे खच्चीकरण करण्याचा डाव सत्ताधारी भाजप आणि या पक्षाचा मित्र असलेल्या काँग्रेसने केला असून त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असे ‘आप’च्या नेत्यांनी फोंड्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. आप उमेदवार गीतेश नाईक यांना हात लावूनच दाखवा, असे आव्हानही यावेळी ‘आप’च्या नेत्यांनी दिले.

यावेळी ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी, उपाध्यक्ष संदेश तेळेकर देसाई व उमेदवार गीतेश नाईक आदी उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी एका प्रकरणात ‘आप’चे उमेदवार गीतेश नाईक यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले असल्याने त्यासंबंधीची प्रतिक्रिया देण्यात आली.

एका क्षुल्लक कारणावरून वॉरंट बजावले असून ही भाजप आणि काँग्रेसची मिलीभगत आहे. गीतेश नाईक यांनी कुणाचा खून केलेला नाही, मात्र फोंडा निवडणुकीत ‘आप’ची वाढती लोकप्रियता पाहून सत्ताधारी बिथरले असून गीतेश नाईक यांना प्रचार करता येऊ नये, म्हणून हे कटकारस्थान केल्याचे वाल्मिकी नाईक म्हणाले.

संदेश तेळेकर देसाई म्हणाले की गीतेश नाईक यांनी घर विकत घेतले. मात्र, या घरावर आधीच कर्ज होते. या कर्जावरूनच सध्या सतावणूक सुरू असल्याचा आरोप देसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 वरिष्ठ कमांडर अटकेत

Goa School: आगरवाडा हायस्कूल इमारतीची आरोलकरांकडून पाहणी; कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी

Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू; शेकडो लोकांनी सोडली घरे

Dudhsagar Jeep Election: जीप असोसिएशनच्या निवडणुकीत नीलेश वेळीप यांचा डंका, दिलीप मायरेकर आणि मयूर मराठेही विजयी; नव्या नेतृत्वाला कौल!

SCROLL FOR NEXT