Goa News Dainik Gomantak
Video

कोलवा येथे दंत इस्पितळाला आग लागून 4 लाखांची हानी

Colva Fire News: या इमारतीत पहिल्या मजल्यावर हे क्लिनिक आहे. आगीचा धूर दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्येही पसरला होता. हा फ्लॅट बंद होता.

Pramod Yadav

मडगाव: कोलवा येथे एका डेंटल क्लिनिकला आग लागून सुमारे चार लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली. शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सौझा यांनी व्यक्त केला आहे.

आगीची माहिती मिळाल्यानंतर दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग शमविली. क्लिनिकच्या रिसेप्शन काऊंटरमध्ये ही आग लागली. यात संगणक, पंखे, खिडकीची तावदाने आणि कपाटे जळाली.

या इमारतीत पहिल्या मजल्यावर हे क्लिनिक आहे. आगीचा धूर दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्येही पसरला होता. हा फ्लॅट बंद होता. तेथे कुणी राहात नसल्याची माहिती मडगाव अग्निशमन दलाच्या कार्यालयातून देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: मिशन फायनल! भारताच्या Playing 11 मध्ये मोठे फेरबदल, 'या' दोन खेळाडूंच्या जागी नवे चेहरे

Omkar Elephant: 'ओंकार'चा धुमाकूळ, हत्तीला गावातून पिटाळून लावण्यासाठी गावकऱ्यांची "हत्ती भगाओ मोहीम!"

Omkar Elephant In Sindhudurg: गोव्यात धुमाकूळ घालणारा 'ओंकार' हत्ती पुन्हा सिंधुदुर्गात, वनविभागाची धावपळ Watch Video

1972 पूर्वीची रस्त्यालगतची घरे, दुकाने कायदेशीर होणार; मुख्यमंत्री माझे घर योजनेचा अमित शहांच्या हस्ते शुभारंभ

IND vs PAK: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या; अंतिम सामन्यात अभिषेक, हार्दिक आणि तिलक खेळणार नाही? कोचने दिलं अपडेट

SCROLL FOR NEXT