Goa Bogus Voters Dainik Gomantak
Video

Suravali Bogus Voters: सुरावलीमध्ये 100 बोगस मतदार, Watch Video

Goa Bogus Voters: सुरावली पंचायत क्षेत्रात १०० बोगस मतदार असून, उपसरपंच कामिल दोरादो यांच्या बारच्‍या पत्त्‍यावर त्यांची नावनोंदणी असल्‍याचे आढळून आले आहे.

Sameer Panditrao

सुरावली पंचायत क्षेत्रात १०० बोगस मतदार असून, उपसरपंच कामिल दोरादो यांच्या बारच्‍या पत्त्‍यावर त्यांची नावनोंदणी असल्‍याचे आढळून आले आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ॲड. राधाराव ग्रासियस यांनी केली. सोमवारी त्यांनी आपल्या कार्यालयात तक्रारदार ज्‍योकिम डायस यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली.

आम्ही या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसेच सासष्टी संयुक्त मामलेदारांकडे तक्रार नोंदविली आहे. या भागातील बीएलओ व अन्य संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांवर फैजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रासियस यांनी केली. तर, दोरादो यांच्या मालकीचे दोन बार आहेत. एका ठिकाणी ८० तर दुसऱ्या ठिकाणी २० जणांची नावे मतदारयादीत आहेत. हे मतदार परप्रांतीय आहेत. त्यांच्याकडे या पत्त्‍यावरील आधारकार्डही नाही. ते कामगार येथे राहत नाहीत, मात्र निवडणुकीवेळी येऊन मतदान करतात, असा आरोप डायस यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT