zeenat aman Dainik Gomantak
मनोरंजन

Zeenat aman : बोल्ड ब्लाऊज आणि डीप क्लिवेज...'सत्यम शिवम सुंदरम'वर 44 वर्षांनी बोलल्या जीनत अमान

अभिनेत्री जीनत अमान यांच्या सत्यम शिवम सुंदरम मधल्या बोल्ड लूकची खूप चर्चा झाली

Rahul sadolikar

zeenat aman : त्या काळात एखादा रोमॅंटिक सीन बघतानाही प्रेक्षकांना जड जायचं. अशा काळात जेव्हा एक अभिनेत्री डीप ब्लाऊज आणि क्लिवेजमध्ये दिसत असेल तर ती अभिनेत्री आणि प्रेक्षक दोघांसाठीही ती सोपी गोष्ट नसते. आम्ही बोलतोय 1978 साली आलेल्या सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटाबद्दल.

 या चित्रपटाबाबत सुरुवातीपासूनच जोरदार चर्चा सुरू होती आणि आजही या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. आता 44 वर्षांनंतर चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस झीनत अमानने यात दाखवण्यात आलेल्या कथित अश्लीलतेवर आपलं मत मांडलं आहे.

झीनत अमानची गणना 70 च्या दशकातील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते ज्यांनी अनेक प्रतिष्ठित व्यक्तिरेखा साकारल्या. त्यातील एक पात्र म्हणजे सत्यम शिवम सुंदरममधील रूपा. झिनत अमान यांच्या बोल्डनेससमोर दीपिकाचा बेशरम रंगही फिका दिसला असता.

झिनत अमान यांनी या चित्रपटात साकारलेली रूपाचा कॉस्च्युम खूपच बोल्ड होता. त्या काळात त्यांच्या बोल्डनेसला पाहुन प्रेक्षकांनी भुवया उंचावल्या होत्या. आता या चित्रपटाला 44 वर्षे पूर्ण होतायत आणि चित्रपटातल्या बोल्डनेसवर चित्रपटाच्या लीड अॅक्ट्रेस झीनत अमान यांनी मौन तोडलं आहे

दीपिका जेव्हा बिकिनी घालून पडद्यावर आली तेव्हा तिच्यावर लज्जास्पद असल्याची जोरदार टीका झाली, तेव्हा झीनतने ही भूमिका साकारली असती तर काय गदारोळ झाला असेल याची कल्पना करा. मात्र चित्रपटातील कलाकार या विषयावर कधीच बोलले नाहीत. आता 44 वर्षांनंतर झीनत अमानने यावर मौन सोडले आहे. 

झीनत अमानने नुकतेच इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे, त्यामुळे चित्रपटाच्या स्क्रीन टेस्टचा फोटो शेअर करताना त्या म्हणाल्या , “मला अश्‍लीलतेच्या आरोपांचे आश्चर्य वाटते कारण मी कधीही मानवी शरीरात अश्लीलता पाहिली नाही. जेव्हा एखाद्या चित्रपटात असे काही चित्रित केले जाते, तेव्हा सर्व काही आधीच कोरिओग्राफ केलेले असते, सर्वांसमोर रिहर्सल होतात. 

झिनत अमान पुढे म्हणाल्या "या चित्रपटातील त्याच्या कास्टिंगबद्दल सांगितले, ज्याबद्दल राज कपूर थोडे तणावात होते. वास्तविक, झीनत अमान एक आधुनिक अभिनेत्री होती तर रूपाची व्यक्तिरेखा देसी होती. अशा अवतारात प्रेक्षकांना ती आवडेल की नाही, अशी भीती राज कपूरना वाटत होती. ज्यासाठी संपूर्ण लुक आणि स्क्रीन टेस्ट करण्यात आली ". 

यानंतर झीनत अमान यांनी जागो मोहन प्यारे या चित्रपटातील एका गाण्यावर एक छोटीशी रील बनवली, जी ऑडिशन साठी गरजेची होती. यावर राज कपूर चांगलेच प्रभावित झाले लगेचच राज कपूरनं झीनत अमान यांना या चित्रपटात कास्ट केलं. रिलीजनंतर यावरून गदारोळ झाला असला तरी हा चित्रपट हिट ठरला. आजही बॉलीवूडच्या सर्वात बोल्ड चित्रपटात त्याचा समावेश होतो.   

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

VIDEO: मैदानावर अपघात! थ्रोचा निशाणा चुकला अन् फलंदाजाला दुखापत; खेळाडूला स्ट्रेचरवरून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

Asia Cup Trophy Controversey: 'मोहसिन नक्वींनी जे केलं ते एकदम बरोबर...'; सूर्यकुमार यादवला अपशब्द बोलणारा पाक क्रिकेटपटू पुन्हा बरळला

Goa Murder Case: प्रियकरासाठीच आईने पोटच्या गोळ्याचा गळा घोटला; रुग्णालयात नेले म्हणून प्रकरणाला वाचा फुटली

SCROLL FOR NEXT