Zayed Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Zayed Khan : शुट सुरू असताना डान्सर कोसळली, झायेद खान कट बोलला आणि फराहने त्याला चप्पल मारली...'मै हू ना'चा तो किस्सा

अभिनेता झायेद खानने 'मै हू ना'च्या शूटींगच्या वेळच्या काही आठवणी सांगितल्या आहेत

Rahul sadolikar

फराह खान दिग्दर्शित 'मै हू ना' हा चित्रपट त्या काळातला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटात शाहरुख खान, सुनील शेट्टी, सुश्मिता सेन, बोमन इराणी अशी तगडी स्टारकास्ट होती.

या चित्रपटात शाहरुख खानच्या भावाचं पात्र साकारलेला अभिनेता झायेद खान या चित्रपटातून पदार्पण करत होता. झायेद खानने या चित्रपटाची एक आठवण सांगितली आहे ज्यात फराह खान त्याला चप्पलने मारायला उठली होती.

झायेदने सांगितलेली ही आठवण 'चले जैसे हवायें' या गाण्याची आहे. झायेद म्हणाला "हे गाणं जमीनीपासून 400 फूट उंचावरती शुट होत होतं. हा किस्सा तेव्हाचा आहे. गाण्याचं शूटींग सुरू होतं.

अमृता रावला माझ्याकडे पळत यायचं होतं, आणि अचानक एक डान्सर कोसळली, शूट तसंच सुरू होतं पण मी अचानक कट म्हणालो आणि शुटींग थांबलं".

पुढे झायेद म्हणााला मी कट बोलताच फराह प्रचंड भडकली कारण हा माझा पहिलाच चित्रपट होता. फराह खूपच चिडली होती तिने मला शिव्या दिल्या आणि चप्पल काढुन मला फेकुन मारली. ती म्हणाली मी सेटवर असताना तू कट बोलू शकत नाहीस कट मीच बोलणार"

यावर मी तिला म्हणालो माझ्यासमोर मी मरत असताना मी नाचू शकत नाही, यावर तिथल्या सगळ्या क्रू च्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यांनी तिला उचललं त्यानंतर गाण्याचं शूटींग पूर्ण झालं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT