Yeh Rishta Kya Kehlata Hai Serial Dainik Gomantak
मनोरंजन

'ये रिश्ता क्या केहलाता'मध्ये होणार मोठे बदल, अक्षरा आई होणार...हर्षद चोपडाऐवजी हा अभिनेता येणार...

ये रिश्ता क्या केहलाता है सिरीयलमध्ये हर्षद चोप्राचं पात्र बदलणं जाण्याची चर्चा सुरू आहे.

Rahul sadolikar

Yeh Rishta Kya Kehlata Hai Serial : सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणून ये रिश्ता क्या केहलाता सिरीयलकडे पाहिलं जातं. या सिरियलने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे.

सिरीयलच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा पक्की केली आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार या सिरीयलमध्ये काही मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. चला पाहुया बदललेल्या सिरीयलमध्ये तुम्ही काय पाहु शकता?

लीपमुळे मालिकेची चर्चा

राजन शाहीचा लोकप्रिय शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' सध्याच्या ट्रॅकमुळे नाही तर त्यातील लीपमुळे चर्चेत आहे. बऱ्याच काळापासून या चित्रपटातील प्रमुख कलाकारांबाबत अनेक नावे पुढे येत आहेत. 

यापूर्वी फहमन खान, शाहीर शेख, रणदीप राय या कलाकारांची नावे समोर येत होती. 20 वर्षांच्या जनरेशन लीपनंतर यापैकी एक कलाकार मालिकेत नव्याने प्रवेश करू शकतो, असे सांगण्यात येत होते. पण आता यापैकी खात्रीलायक सांगता येतील अशा नावांचा उल्लेख केला जात आहे. .

अक्षरा आई होणार?

हर्षद चोप्रा आणि प्रणाली राठोड काही वर्षांपासून 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये महत्त्वाच्या भूमीकेत दिसले आहेत. अभिमन्यू आणि अक्षराच्या भूमिकेत लोक त्यांना पसंत करत आहेत. 

सध्याच्या ट्विस्टबद्दल बोलायचे झाले तर अक्षरा आई होणार आहे. ती अभिनवच्या मुलाला या जन्म देणार आहे. या दोघांचा ट्रॅक 10 नोव्हेंबरपूर्वी संपवला जाईल. प्रणाली आणि हर्षद आता काही दिवसांचे पाहुणे आहेत. त्यानंतर त्यांची मुले मोठी होतील.

अभिनेता शहजादा धामी दिसणार या भूमीकेत

'टेली चक्कर'च्या रिपोर्टनुसार, 'शुभ शगुन' फेम अभिनेता शहजादा धामी चौथ्या पिढीच्या लीपमध्ये प्रवेश करणार आहे. या शोमध्ये तो महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. . 

शहजादा धामीने 'ये जादू है जिन का' मध्ये काम केले आहे. अभिनेता असण्यासोबतच तो सोशल मीडियावर त्याच्या कवितांसाठीही प्रसिद्ध आहे.

शिवमची एन्ट्री होणार

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, शिवम खजुरिया या शोमध्ये दिसणार आहे. तो हर्षद चोप्राची जागा घेणार आहे. अहवालात असाही दावा केला जात आहे की निर्मात्यांनी अभिनेत्याला नायक म्हणून साइन केले आहे. '

मिळालेल्या माहितीनुसार, लीपनंतर शिवम शोचा भाग होईल आणि तो कदाचित अभिरची भूमिका साकारू शकेल. मात्र निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे. प्रेक्षकांनी शिवमला 'मोल्लकी', 'मन सुंदर' आणि 'कुमकुम भाग्य'मध्ये पाहिले आहे.

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT