यतिन तळावलीकर (Yatin Talawalikar) हे एक अजब रसायन आहे जे संगीत (Music) , समाजकारण व व्यवसाय या तीनही क्षेत्रात प्रचंड ताकदीने आपलं वलय निर्माण करत आहे. या तिन्ही क्षेत्रातील, यतिनच्या कार्याचा एकाच वेळी आढावा घेणं हे काम अतिशय कठीण आहे. संगीत (Music) क्षेत्राच्या आकाश गंगेत अगदी प्राथमिक झेप घेणारा छोटासा यतिन व आत्ता त्याच क्षेत्रात प्रखर आत्मविश्वासाने उंचच उंच भराऱ्या मारताना दिसतो आहे.
गोवा (Goa) नावाच्या कलाकारांच्या खाणीतुन गवसलेला यतिन तळावलीकर (Yatin Talawalikar) हा एक अनमोल हिरा आहे. यतिन तळावलीकर हे गोव्यातील (Goa) प्रख्यात तबला (Tabla) वादकांपैकी एक अग्रक्रमांकाचं नाव आहे. तबल्याबरोबरच, ढोलकी, ढोलक, ड्रम्स, हार्मोनियम ही वाद्यंसुध्दा तो तेवढ्याच कौशल्याने वाजवतो. अगदी कसलेल्या व मुरलेल्या भावगीत गायकाच्या गळ्यातून क्वचित निघणाऱ्या हरकती, यतिन सहज गाऊन जातो. ही आश्चर्यकारक व दुर्मिळ गोष्ट आहे.
गोव्यातील (Goa) भावगीतांच्या कार्यक्रमात अामूलाग्र बदल घडवून आणण्यात यतिनचा (Yatin Talawalikar) मोठा वाटा आहे. गोव्यातील (Goa) वादक कलाकारांना देशातील प्रख्यात वादक कलाकारांसोबत संगीत (Music) साथ करण्याची संधी सर्व प्रथम यतिन तळावलीकर यानेच दिली. स्वतः उत्तम ढोलकीवादक असूनही, श्री. निलेश परब व श्री. कृष्णा मुसळेसर यांच्यासारख्या मातब्बर ढोलकीवादकांना आपल्या कार्यक्रमात साथ करण्यासाठी, खास मुंबईतून गोव्यात (Goa) आमंत्रित करून आपण केवळ एक श्रोता म्हणून समोर बसून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचं धाडस फक्त एकटा यतिनच (Yatin Talawalikar) करू जाणे. श्री. निलेश परब व श्री. कृष्णा मुसळेसर यांच्याबरोबरच, देशातील अव्वल दर्जाचे बासरीवादक श्री. अमर ओक व श्री. वरद कठापूरकर यांच्यासोबत भावगीत कार्यक्रमातून साथसंगत करण्याची संधी आम्हा गोमंतकीय कलाकारांना यतिननेच दिली.
जे जे उत्तम ते आणि तेच श्रोत्यांपर्यंत पोचवायचं हाच त्याचा ध्यास असतो. यतिन, फार मोठ्या प्रमाणात सुगम संगीत (Music) किंवा भावगीत कार्यक्रमातून साथसंगत करत असला तरी त्याला शास्त्रीय संगीताची बरीच जाण व माहिती आहे आणि याच बळावर तो अनेक कोंकणी व मराठी गाण्यांना (Song)अतिशय गोड चाली देऊ शकला. भक्तिसंगीत हा यतिनचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. भक्तिगीतं व अभंग यातील शब्द व भाव समजून त्यांना साजेशी संगीत रचना करणे हे यतिनच्या (Yatin Talawalikar) फार आवडीचं व भक्तिभावाचे काम. गोमंतकातील नावाजलेल्या गायकांसोबतच, मंदार आपटे, सावनी रवींद्र, अभिजीत कोसंबी, श्रीरंग भावे, नेहा राजपाल इत्यादी प्रथितयश गायक गायिकांनी, यतिनने संगीतबद्ध केलेली गाणी (Song) गाऊन ध्वनिमुद्रित केली आहेत एवढंच नव्हे तर भजन सम्राट पं. अजित कडकडे, पं. सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, शंकर महादेवन (Shankar Mahadevan) इत्यादी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायकांनी यतिनच्या स्वररचना गायल्या आहेत. या सर्व महान कलाकारांनी यतिनचं व त्याच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे.
आता श्रीरामनाथ देवस्थान, रामनाथी - फोंडा( Ponda) यांच्या येऊ घातलेल्या ध्वनिफितीद्वारे, यतिन तळावलीकर, गोमंतकीयांसाठी फार गौरवास्पद ठरणारा एक नवीन विक्रम प्रस्थापित करणार आहे. श्री देव रामनाथाचं गुणगान करणारी, श्री. नंदन हेगडे देसाय या नावाजलेल्या गोमंतकीय गीतकारानी लिहीलेली आठ गाणी, यतिन तळावलीकर (Yatin Talawalikar) याने संगीतबद्ध केली आहेत. मुंबईतील (Mumbai) सुप्रसिद्ध संगीत संयोजक श्री. मिथिलेश पाटणकर यांनी या गीतांचं संगीत (Music) संयोजन केलं आहे. खरी मेख तर पुढेच आहे. पं. सुरेश वाडकर, श्री. महेश काळे, पं. शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, बॉलीवूडमधे (Bollywood) आपला वेगळा ठसा उमटविणारे गोव्याचे (Goa) लाडके गायक श्री. सुदेश भोसले, श्री. राहुल देशपांडे, बॉलीवूडची (Bollywood) सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल व सारेगम लिटल चॅम्प्स फेम गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकर (Aarya Ambekar) या आठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किर्तीच्या गायक गायिकांनी या गाण्यांना (Song) आपल्या आवाजाने सजवलं आहे. एकाच कोंकणी ध्वनिफितीत एवढ्या मोठ्या कलाकारांनी एकत्र येऊन, एकाच गोमंतकीय संगीतकाराने संगीतबद्ध केलेली गाणी गाण्याचा हा पहिलाच योग आहे. श्री. अशोकजी पत्की यासारख्या, नावाजलेल्या, यशस्वी व प्रस्थापित संगीतकाराने यतिनच्या स्वररचनांचं कौतुक केलं आहे हे विशेष. गोमंतकीय संगीत क्षेत्रातील, 'यतिन तळावलीकर ' नावाच्या या उगवत्या ताऱ्याने संगीतबद्ध केलेल्या भक्तिगीतांच्या या ध्वनिफितीचं मनःपूर्वक स्वागत होईल यात शंकाच नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.