Yaariyan Box Office Collection Day 1 Dainik Gomantak
मनोरंजन

चुलत भावांच्या मैत्रीच्या गोष्टीकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ...'यारीया' बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सुस्तच

राधिका राव दिग्दर्शित यारीया 2 हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम यश मिळवले आहे

Rahul sadolikar

Yaariyan Box Office Collection Day 1 : राधिका राव दिग्दर्शित यारीया 2 हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाल दाखवण्यात यश मिळवले आहे. चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई पाहता यारियाने कलेक्शनच्या बाबतीत कमाई केली असं म्हणता येणार नाही.

चित्रपटाची कमाई

दिव्या खोसला , मीझान जाफरी आणि पर्ल व्ही पुरी अभिनीत रोमँटिक कॉमेडीला त्याच्या पहिल्या दिवशी खराब प्रतिसाद मिळाला. Sacnilk.com ने शेअर केलेल्या सुरुवातीच्या अंदाजानुसार शुक्रवारी चित्रपटाने सुमारे ₹ 60 लाखांची कमाई केली . हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹ 5.65 टक्के इतकीच कमाई केली आहे.

गणपतसोबत रिलीज

यारियां 2 शुक्रवारी टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनचा अॅक्शन चित्रपट गणपत सोबत रिलीज झाला. गणपतसोबत रिलीज झालेल्या या चित्रपटाने म्हणावी तशी कामगिरी केली नाही.

चुलत भावांमधील जवळीक आणि त्यांच्यापैकी एकाने लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याचा कसा परिणाम होतो याभोवती चित्रपटाच कथा फिरते. दिव्या लाडलीची भूमिका करते, जिच्या लग्नामुळे तिच्या चुलत भावांसोबतच्या नात्यात बदल होतो आणि काही आव्हाने समोर येतात.

 यारीयामध्ये यश दासगुप्ता, अनस्वरा राजन, वारिना हुसैन आणि प्रिया वारियर यांच्याही भूमिका आहेत

यारिया 1 आणि 2

यारिया 2 चित्रपटाचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू यांनी केले आहे. याची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, दिव्या खोसला कुमार आणि आयुष माहेश्वरी यांनी केली आहे. हा चित्रपट टी-सीरीज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला आहे. 

2014 मध्‍ये दिव्‍याने स्‍वत:च पहिल्‍या भागाचे दिग्‍दर्शन केले होते, ज्यात हिमांश कोहली आणि रकुल प्रीत सिंह प्रमुख भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर तो चित्रपट यशस्वी ठरला.

चुलत भावांची मैत्री मोठ्या पडद्यावर

यारियां 2 ची थीम शेअर करताना दिव्या म्हणाली, ANI नुसार, “चित्रपट खूप मनोरंजक आहे. चित्रपटात प्रत्येक भावना आहे. नाटक आहे, कॉमेडी आहे, रोमान्स आहे. तीन चुलत भावांच्या मैत्रीभोवती चित्रपट फिरतो. पहिल्यांदाच चुलत भावांची मैत्री मोठ्या पडद्यावर दाखवली जात आहे...आम्ही लोकांना विनंती करतो की 20 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात येऊन आमचा चित्रपट पहा.

मीझान आणि दिव्या

मीझान आणि दिव्याला चित्रपटाच्या सेलिब्रेशनमध्ये एकत्र पाहिले गेले होते. दिव्यासोबतच्या त्याच्या बॉण्डबद्दल बोलताना मीझानने एएनआयला सांगितले की, “दिव्या जी 15 वर्षांपासून माझ्या शेजारी होत्या आणि मी आता शिफ्ट झालो आहे. याआधी मला तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. 

शेवटी, आम्ही या चित्रपटावर काम केले. या चित्रपटाच्या माध्यमातून तिला एक अभिनेत्री म्हणून ओळखण्याची संधी मिळाली. मला वाटतं आज आम्ही जवळचे मित्र झालो आहोत. अगदी पर्ल मला या चित्रपटातच भेटला होता. त्याआधी मी त्याला ओळखत नव्हतो. आता आम्ही जवळचे मित्र झालो आहोत."

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT