Article 370 Movie Banned in 5 States Dainik Gomantak
मनोरंजन

Article 370 Movie: मोदींनी कौतुक केलेल्या 'आर्टिकल 370' चित्रपटावर या पाच देशांनी घातली बंदी

दैनिक गोमन्तक

Article 370 Banned in 5 Countries

गेल्या काही दिवसांपासून यामी गौतमचा आर्टिकल ३७० हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींनी जम्मू दौऱ्यावर असताना या चित्रपटाचे कौतुक केल्याने आणि या चित्रपटामधून सत्य सर्वांसमोर येईल असे म्हटल्याने या चित्रपटाची मोठी चर्चा होती. आता मात्र ५ देशांमध्ये या चित्रपटाला बॅन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून यामी गौतमचा आर्टिकल ३७० हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींनी जम्मू दौऱ्यावर असताना या चित्रपटाचे कौतुक केल्याने आणि या चित्रपटामधून सत्य सर्वांसमोर येईल असे म्हटल्याने या चित्रपटाची मोठी चर्चा होती. आता मात्र ५ देशांमध्ये या चित्रपटाला बॅन केले आहे.

बहरीन, कुवेत, इराक, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या देशातील प्रेक्षक अशाप्रकारचे चित्रपट पाहण्यास सक्षम नसल्याचे म्हटले आहे. चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला हा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

आदित्य सुहास जांभळे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात राजकीय विषयांची सखोल मांडणी करण्यात आली आहे. 'कलम 370' भारत सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर येणारी आव्हाने दर्शवते. या चित्रपटात असे अनेक मुद्दे दाखवण्यात आले आहेत ज्यांची लोकांना अजूनही माहिती नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातही या चित्रपटाचा उल्लेख करण्यात आला होता. या प्रकरणाची योग्य माहिती देण्याची क्षमता असल्याबद्दल निर्मात्यांचे कौतुक केले जात आहे.

यामी गौतमने झुनी हक्सर नावाच्या गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे आणि कलम 370 अंतर्गत जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा काढून टाकण्याभोवती फिरते. दरम्यान, बॉक्स ऑफीसवर यामी गौतमचा हा चित्रपट किती कमाई कऱणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT