बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला स्वतंत्र प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. यामी गौतम ही अशा कलाकारांपैकी एक आहे जिने आपल्या सहज अभिनयातून आणि मोजक्या चित्रपट आणि वेबसीरीज मधून आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या ती 'आर्टिकल ३७०' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या भूमिकेचे कौतुकदेखील होताना दिसत आहे. मात्र या निमित्ताने जाणून घेऊयात तिचे सर्वोत्तम ५ चित्रपट-वेब सीरीज कोणते आहेत, जे ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
यामी गौतमचा रिलेशनशिपवर आधारित चित्रपट पाहायचा असेल तर तिचा विक्रांत मेस्सीसोबतचा 'जिनी वेड्स सनी' हा उत्तम चित्रपट आहे. ज्यामध्ये कॉमेडीचा तडखादेखाल पाहायला मिळतो. या चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
यामी गौतम, अतुल कुलकर्णी, नेहा धुपिया, डिंपल कपाडिया आणि करणवीर शर्मा स्टारर '. 'अ थर्सडे' हा एक थ्रिलर चित्रपट आहे, जो बेहजाद खंबाटा यांनी लिहला आणि दिग्दर्शित केला आहे. ही कथा शाळेतील शिक्षिका नयना गौतमभोवती फिरते. हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवतो. हा चित्रपट डिसने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
'दसवी' हा 2022 साली प्रदर्शित झालेला सोशल कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले असून त्यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला. यामीसोबत अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर देखील आहेत. यामीने या चित्रपटात आयपीएस अधिकाऱ्याची दमदार भूमिका साकारली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.
'चोर निकल के भागा' हा अजय सिंग दिग्दर्शित लुटमारीवर आधारित थ्रिलर चित्रपट आहे. यात यामीसोबत सनी कौशल, शरद केळकर, इंद्राणीस सेनगुप्ता आणि बरुण चंदा दिसले होते. हा चित्रपट नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.
यामीचा हा चित्रपट झी5ओरिजनल या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा थ्रिलर चित्रपट अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी दिग्दर्शित केला होता. यामी गौतमसह पंकज कपूर, राहुल खन्ना, नील भूपलम, पिया बाजपेयी या स्टार कास्टचाही समावेश आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात खूप कौतुक करण्यात आले.
दरम्यान, यामी गौतमने २००९ साली कन्नड भाषिक 'उल्लासा उत्साह' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. २०१२ ला तिने 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.
यामी गौतम या अभिनेत्रीने आत्तापर्यंत आपल्या करिअरमध्ये काबील, उरी: द सर्जीकल स्ट्राइक, बदलापूर, बाला सनम रे , ज्युनूनियत, भूत पोलिस, बत्ती गुल मीटर चालू, अॅक्शन जॅक्सन यासारख्या अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारत तिने आपल्या अभिनयाची झाप सोडली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.