Randeep Hooda Dainik Gomantak
मनोरंजन

अभिनेता रणदीप हुडाला लेखिकेने पाठवली 10 कोटींची लीगल नोटीस

पटकथा लेखक असलेल्या प्रिया शर्मा असेही म्हणाल्या की, त्यांनी आपल्या कामाला पुढे ढकलले आणि प्रियाने चित्रपटाची स्क्रिप्ट परत मागितली तेव्हा आपल्याला धमकी दिली.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: बॉलिवूड (Bollywood) पटकथालेखक प्रिया शर्मा यांनी अभिनेता रणदीप हुड्डाला (Randeep Hooda) कायदेशीर नोटीस पाठवली आहे. प्रिया शर्माचा आरोप आहे की, रणदीपने आपल्याला दिलेला एक शब्द पाळला नाही, आणि तो आता आपल्याला एका प्रकरणात धमकावत आहे. प्रिया शर्मा यांचा आरोप आहे की, 'रणदीप आणि त्याच्या मित्रांनी आपल्याला आश्वासन दिले होते की, तो आपल्यासोबत काम करेल.’ एवढेच नाही तर आपण १५ वर्षांत लिहीलेली स्क्रिप्ट आणि गाणे सुद्धा त्यांनी घेतले आहेत.' असा आरोप या लेखीकेने केला आहे.

प्रिया असेही म्हणाल्या की, त्यांनी आपल्या कामाला पुढे ढकलले आणि प्रियाने चित्रपटाची स्क्रिप्ट परत मागितली तेव्हा आपल्याला धमकी दिली. प्रियाने रणदीप हुड्डा आणि इतरांच्या विरोधात तिच्या वकिलामार्फत 10 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे.

2021 मध्ये प्रिया शर्मा सोशल मीडियाद्वारे रणदीप हुड्डाच्या संपर्कात आली होती. तिने दावा केला की, रणदीप हुड्डाने आईबद्दल सांगितले होते. यानंतर, रणदीप हुड्डाच्या आईने प्रिया शर्माला रणदीप हुड्डाचा मॅनेजर पांचाली चक्रवर्ती आणि रेणुका पिल्लेला स्क्रिप्ट पाठवण्यास सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT