ind vs pak  Dainik Gomantak
मनोरंजन

IND vs PAK: क्रिकेटचा फिव्हर बॉलीवूडवरदेखील; भारत- पाकिस्तानच्या सामन्यासाठी 'या' कलाकारांनी लावली हजेरी

IND vs PAK: आता या सामन्यात कोणता संघ कोणावर भारी पडणार आणि आजचा सामना कोण आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमन्तक

IND vs PAK: वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तानचा क्रिकेट सामना संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेताना दिसतो. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याची अनेकांना उत्सुकता असते. आज भारत-पाकिस्तानमधील सामन्याची अनेकजण वाट पाहत होते.

गुजरात मध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणाऱ्या या सामन्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने देखील उपस्थिती लावली असून भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी त्याने या सामन्याला उपस्थिती लावली आहे. याबरोबरच बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आणि विराट कोहली( Virat Kohli )ची पत्नी अनुष्का शर्मानेदेखील या सामन्याला उपस्थिती दर्शवली आहे.

महत्वाचे म्हणजे, भारत-पाकिस्तान सामन्याआधी होणाऱ्या कार्यक्रमासाठी बॉलीवूड( Bollywood )चे अनेक कलाकार एकत्र जमले आहेत. अमिताभ बच्चन, रजनीकांत असे बडे कलाकारदेखील या सामन्याला हजर राहणार असून लोकप्रिय गायक अरजित सिंगदेखील आपल्या आवाजाने स्टेजची शोभा वाढवणार आहे.

दरम्यान, हा सामना कोण जिंकणार असा प्रश्न विचारल्यावर सचिन तेंडूलकरने पत्रकाराला उत्तर देताना म्हटले आहे की, याचे उत्तर तुम्हाला आणि मला माहीत आहे. आता या सामन्यात कोणता संघ कोणावर भारी पडणार आणि आजचा सामना कोण आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT