World Cotton Day |Vidya Balan Dainik Gomantak
मनोरंजन

World Cotton Day: बॉलिवूड स्टार्सनाही सुती कपड्यांची भूरळ

दैनिक गोमन्तक

कॉटन हे एक फॅब्रिक आहे जे हलके, आरामदायी आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. पण, हे फक्त कापड नसून जीवनशैलीचा एक मोठा भाग आहे. त्यामागे एक मोठा वस्त्रोद्योग आहे. ज्याच्याशी सर्व स्तरातील लोक जोडलेले आहेत. जागतिक कॉटन दिवस (World Cotton Day) दरवर्षी 7 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश कापूस उद्योगाबद्दल जागरूकता पसरवणे आणि आर्थिक, जागतिक आणि गरिबीमध्ये या उद्योगाची भूमिका अधोरेखित करणे आहे. अशाच काही बॉलीवूड सेलिब्रिटीं आहेत ज्यांचे कॉटन कपड्यावर अतिशय प्रेम आहे.

घरातील फंक्शन असो किंवा कोणताही सण, एथनिक कपड्यांमध्ये करिश्माची पहिली पसंती कॉटनला असते. या फोटोमध्येच पाहा, करिश्मा पिवळ्या कॉटन शरारा आणि कुर्त्यासोबत पांढरा फुलांचा दुपट्टा परिधान करताना दिसत आहे. 

विद्या बालनला सर्वात प्रिय कॉटनच्या साड्या आहेत. ती अनेकदा सुंदर कॉटन साड्या नेसलेली दिसते. 

अभिनेत्री तापसी पन्नू कधी कॉटन कुर्ता तर कधी साडी नेसलेली फोटो शेअर करत असते. तिचे व्यक्तिमत्वही असे आहे की तिच्यावर कॉटनचे कपडे खूप छान दिसतात. शेवटी, कॉटन इतका आरामदायक आहे की तापसी देखील ते पुन्हा पुन्हा घालण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. 

साराला फिल्मी पडद्यावर तसेच खऱ्या आयुष्यात कॉटन सूट, कुर्ता आणि ड्रेस घालायला आवडते. आजही सारा अली खानचे तिच्या कॉटन कुर्तेसाठी कौतुक केले जाते. 

कापूस, लिनेन आणि सिल्कच्या साड्या, कुर्ते आणि कपड्यांमध्येही दीया अनेकदा फोटो शेअर करतांना दिसली आहे. इन्स्टाग्रामवर या कपड्यांबद्दल पोस्ट करून, ती अनेकदा इतर लोकांना ते परिधान करण्याबद्दल जागरूक करताना दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT