Malaika Arora And Arjun Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

सनई-चौघडे वाजणार! मलायका अरोरा अन् अर्जून कपूर अडकणार विवाहबंधनात?

48 वर्षीय मलायका आणि 36 वर्षीय अर्जुनने आता या नात्याला एक नवे नाव देण्याचे ठरवले आहे.

दैनिक गोमन्तक

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करतायेत आहेत. हे दोन्ही कलाकार 4 वर्षांपासून एकमेकांसोबत नात्यामध्ये आहेत. दोघांना अनेकदा माध्यमांनी एकत्र स्पॉट केले आहे. त्यांच्या नात्याची चर्चा रोजच होत असते. 48 वर्षीय मलायका आणि 36 वर्षीय अर्जुनने आता या नात्याला एक नवे नाव देण्याचे ठरवले आहे. (Will Malaika Arora and Arjun Kapoor get married)

बॉलिवूड पोर्टल 'बॉलिवूड लाईफ'च्या रिपोर्टनुसार, एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेले अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आता त्यांच्या नात्याचे लग्नात रूपांतर करणार असल्याचे म्हटले जात आहे. अर्जुन आणि मलायका यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या हिवाळ्यात लग्न करू शकताता असे वर्तवले जात आहे.

मुंबईतील बातम्यांवर विश्वास ठेवला तर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नात फारशी धामधूम करणार नसले तरी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हे लग्न मुंबईत पार पडणार आहे. बॉलीवूडमधील (Bollywood) इंटिमेट वेडिंगच्या ट्रेंडच्या धर्तीवर अर्जुन-मलायकाही लग्न करण्याचा विचारात आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लग्नाच्या पार्टीपूर्वी त्यांच्या लग्नाची नोंदणी करणार आहेत. त्यांच्या लग्नाला बॉलीवूडचे मोजकेच सेलिब्रिटी आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आणखी समोर आलेली नाही.

मलायकाने लग्नाविषयी आधीच सांगितले आह की,

अर्जुन कपूर पहिल्यांदाच लग्न करणार आहे तर मलायका अरोराचे हे दुसरे लग्न आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती की, 'त्या दोघांना त्यांच्या नात्याचे भविष्य दिसून येत आहे. अर्जुन कपूर माझ्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती आहे आणि आम्हाला आमच्या नात्याला एक नाव देखील द्यायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT