Gangubai Kathiawadi Dainik Gomantak
मनोरंजन

दाक्षिणात्य चित्रपटांना मागे टाकत 'गंगूबाई काठियावाडी' थिएटर गाजवणार?

गंगूबाई काठियावाडीचे OTT हक्क नेटफ्लिक्सकडे आहेत.

दैनिक गोमन्तक

आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या एक दिवस आधी प्रदर्शित झालेल्या साऊथ सुपरस्टार अजितचा तमिळ चित्रपट 'वलिमै'ने पहिल्याच दिवशी धुमाकूळ घातला. यासोबतच रिलीज झालेल्या अभिनेता पवन कल्याणच्या 'भीमला नायक' या चित्रपटालाही दमदार ओपनिंग मिळाली आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘गंगुबाई काठियावाडी’ हा हिंदी चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडू शकलेला नाही. चित्रपटाने शुक्रवारी 10 कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. दुसरीकडे वलिमै चित्रपटाने 75 कोटी कमवले आहेत.

'गंगूबाई काठियावाडी'चे OTT हक्क नेटफ्लिक्सला (Netflix) आणि सॅटेलाइट हक्क झी सिनेमाला विकून, निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रचंड खर्चाचा मोठा भाग वसूल केला असला तरी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस (Box Office) कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंदी बरोबर तेलगूमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या धर्मा प्रॉडक्शनच्या 'कलंक' चित्रपटाने (Movie) पहिल्या दिवशी 21.60 कोटींची कामाई केली होती. 10 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या आलिया भट्टच्या चित्रपटांमध्ये 'उडता पंजाब' (10.05 कोटी), 'बद्रीनाथ की दुल्हनिया' (12.25 कोटी), '2 स्टेट्स' (12.42 कोटी), 'शानदार' (13.10 कोटी), 'गली बॉय' (19.40 कोटी) आणि 'कलंक' (21.60 कोटी) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT