मनोरंजन

Bigg Boss 16 मध्ये अजय देवगणची एन्ट्री होणार का? या हंगामात नवीन काय आहे जाणून घ्या!

दबंग खान होस्ट करत असलेला हा शो 01 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेल्या बिग बॉस सीझन 16 (Bigg Boss 16) चा पहिला प्रोमो रविवारी रिलीज झाला आहे. टीव्हीच्या या सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये सलमान खान प्रत्येक वेळी प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतो. शोच्या पहिला प्रोमोत प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज देण्यात आले आहे. चला तर जाणून घेऊयात बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये यावेळी नवीन काय असणार आहे?

दबंग खान होस्ट करत असलेला हा शो 01 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. शोच्या प्रीमियर एपिसोडमध्ये सलमान खानची आवडती अभिनेत्री शहनाज गिल (Shenaz Gill) देखील दिसणार आहे. यावेळचा प्रीमियर भाग मागील सर्व सीझनपेक्षा वेगळा आणि खास असेल. शोच्या टीझर व्हिडिओने सर्व प्रेक्षकांना खूप गोंधळात टाकले आहे.

प्रोमो व्हिडिओमध्ये पार्श्वभूमीतून येणारा आवाज अजय देवगणचा (Ajay Devgan0 असल्याचे सांगण्यात येत आहे. अजय देवगण देखील शोचा एक भाग असू शकतो असे बोलले जात आहे. प्रोमोत अजय देवगणचा बॅकराऊंडमधून आवाज येत आहे प्रोमो व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे सांगितले जात आहे की 15 वर्षांपासून प्रत्येकजण आपला खेळ खेळत होता, परंतु यावेळी बिग बॉस स्वतः खेळणार आहे. या एका ओळीने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

शोमध्ये अजय देवगणच्या एंट्रीबद्दल बोलले जात आहे. तसेच, बिग बॉस यावेळेस खेळाडूंना शिक्षा पूर्वीपेक्षा अधिक कठीण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

SCROLL FOR NEXT