Nawazuddin siddiqui

 

Dainik Gomantak

मनोरंजन

अपुन ही भगवान है म्हणणाऱ्या नवाजुद्दीनला का आवडत नाही त्याचे हिट डायलॉग्स?

देवावर विसंबून राहू नका, काय माहित देव तुमच्या भरवशावर बसला असेल. माझा असा विश्वास आहे की, माणसाने उठून काही काम केले तर देवही त्याला साथ देतो

दैनिक गोमन्तक

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin siddiqui) हा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याचे चित्रपट पडद्यावर जास्त झळकले नसले तरी त्याच्या डायलॉगने (dialogues) सिनेरसिकांना वेड लावले आहे. त्याने बोललेले संवाद नक्कीच आयकॉनिक बनले आहेत. चित्रपटांमध्ये नवाजने बोललेले असे अनेक संवाद आहेत, जे इतके लोकप्रिय झाले की सोशल मीडियावर त्याचे मीम्सही बनले. आणि लोकांच्या ते ओठांवरही कायम राहिले आहे.

सामान्य जीवनातही आपण अनेकदा नवाजचे डायलॉग बोलून वातावरण लाइट करतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द नवाजुद्दीनला त्याचे लोकप्रिय डायलॉग्स आवडत नाहीत. असा खुलासा नवाजुद्दीनने एका टिव्ही चॅनलशी बोलताना केला आहे.

लोकप्रिय संवाद आवडत नाहीत

आवडत्या डायलॉगचा प्रश्न विचारल्यावर नवाजने अनोखे उत्तर दिले. "माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या डायलॉगवर बनवलेले सर्व मीम्स मला कधीच आवडले नाहीत. बाप का दादा का.. अपूनीच भगवान है...मला हे सगळं अजिबात आवडलं नाही. कधी कधी मला असं वाटतं की या सगळ्या संवादांमध्ये मी खूप वाईट काम केलंय म्हणून त्यावर मिम्स तयार झाले आणि ते लोकप्रिय झाले."

दुसरीकडे, नवाज त्याच्या आवडत्या डायलॉगवर म्हणतो, माझा आवडता डायलॉग माझ्या चित्रपटातील आहे. चित्रपटातील शेवटच्या दृश्यात एक लाइन आहे जी नवाज ला आवडते. ती म्हणजे, "देवावर विसंबून राहू नका, काय माहित देव तुमच्या भरवशावर बसला असेल. माझा असा विश्वास आहे की, माणसाने उठून काही काम केले तर देवही त्याला साथ देतो." (भगवान के भरोसे मत बैठो क्या पता भगवान तुम्हारे भरोसे बैठा है. मैं मानता हूं कि बंदा उठकर अगर कोई काम करता है, तो भगवान भी उसी का साथ देता है.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT