Why is Indian Panorama Division important in IFFI  Dainik Gomantak
मनोरंजन

इफ्फीतला ‘इंडियन पॅनोरमा विभाग’ महत्त्वाचा का असतो?

यावर्षीच्या ‘इंडियन पॅनोरामा’त मराठी, बंगाली आणि कन्नड चित्रपटांचे वर्चस्व दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

इफ्फीतला (IFFI) ‘इंडियन पॅनोरमा विभाग’ इतक्यासाठी महत्त्वाचा असतो की तो भारतीय सिनेमांचा अर्वाचीन प्रवाह स्पष्ट करतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तुलनेत दर्शक या विभागाकडे कमी लक्ष देत असले तरी ‘इंडियन पॅनोरामा’ भारतीय चित्रपट दिग्दर्शकांसाठी नेहमीच एक आसुसलेले व्यासपीठ राहिले आहे. यावर्षीच्या ‘इंडियन पॅनोरामा’त मराठी, बंगाली आणि कन्नड चित्रपटांचे वर्चस्व दिसून येत आहे.

फिचर आणि नॉन फिचर या दोन्ही विभागात मिळून सात बंगाली चित्रपट आहे आहेत, सहा मराठी चित्रपट आणि चार कन्नड चित्रपट आहेत. तसे नॉन फिचर विभागात सात व फिचर विभागात दोन असे हिंदी चित्रपट असले तरी ते सिनेमाचे भाषिक (प्रादेशीकदृष्ट्या) प्रतिनिधित्व करतात असे म्हणता येणार नाही. प्रादेशिक सिनेमाच सामान्यांची कहाणी घेऊन तडफेने पुढे सरसावतात. त्यातली मांडणी अधिक मूलगामी असते आणि अर्थातच त्याला वैश्विक मूल्यही असते. किंबहुना प्रादेशिक असल्यामुळेच दर्शकांकडून हे वैश्विक मूल्य अधिक समजून-उमजून स्वीकारले जाते.

‘मी वसंतराव’ (दिग्दर्शक: निपुण अधिकारी), ‘बीटरस्वीट’ (दिग्दर्शक: अनंत महादेवन), ‘गोदावरी’ (दिग्दर्शक: निखिल महाजन), ‘फ्युनरल’ (दिग्दर्शक: विवेक दुबे) ‘निवास’ (दिग्दर्शक: मेहुल अगजा) हे फीचर विभागात निवड झालेले मराठी सिनेमा आहेत. ‘मर्मर्स आफ जंगल’ (दिग्दर्शक: सोहील वैद्य) हा नॉन फिचर विभागात निवड झालेला मराठी लघुपट आहे.

इंग्रजी, मल्याळम, तामिळ, तेलुगू, संस्कृत या प्रस्थापित भाषेव्यतिरिक्त बोडो, दिमसा, मिशिंग, गर्हवाली, संथाळी अशा फार कमी ठाऊक असलेल्या भारतीय भाषांमधल्या चित्रपटांचा समावेशही इंडियन पॅनोरमा विभागात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT