Sushant Singh Rajput and Karan Johar Dainik Gomantak
मनोरंजन

सुशांत द ग्रेट: करण जौहरने सुशांतवर इम्प्रेस असण्याचा केला खुलासा

बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माता करण जोहरसुद्धा (Karan Johar) सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आकर्षणाने खूप प्रभावित झाले होते.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (bollywood) अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आज या जगात नसला तरी त्याचे आकर्षण अजूनही लोकांना प्रभावित करते. सुशांतसिंग राजपूत जिथे जात असे तेथे तो सगळ्यांचं मन जिंकत असे. बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माता करण जोहरसुद्धा (Karan Johar) सुशांतसिंग राजपूतच्या आकर्षणाने खूप प्रभावित झाले होते. या गोष्टीमुळे सुशांत सिंग राजपूतचा जुना व्हिडिओ आजकाल खूप व्हायरल होत आहे.(Wherever he used to go Sushant Singh Rajput used to steal the limelight Karan Johar was also impressed)

हा व्हिडिओ कलर्स चॅनेलवर प्रसारित झालेल्या इंडियाज गॉट टॅलेंट रिअ‍ॅलिटी (India's Got Talent) शोचा आहे. या व्हिडिओमध्ये करण जोहर अतिशय मजेदार पद्धतीने सुशांत सिंग राजपूतला मिठी मारताना पाहु शकता. शो दरम्यान त्याने मलायका अरोराबरोबर (Malaika Arora) भयंकर डान्स देखील केला आहे. त्यावेळी मलायका आणि करण या कार्यक्रमाचे जज होते आणि सुशांतसिंग राजपूत आणि सारा अली खान शो मध्ये केदारनाथ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येथे दाखल झाले होते.

व्हिडिओमध्ये आपण पाहु शकता की शोचे होस्ट रित्विक धनजानी आणि भारती सिंग यांनी सुशांत सिंगला स्टेजवर बोलावून खूप मस्ती केली आहे. रित्विक धनजानी आणि सुशांत सेटवर फिरताना दिसतात. तो प्रेक्षकांसह डान्स करतो. दरम्यान, सुशांतसिंग राजपूत प्रथम मलायका अरोराबरोबर डान्स करतो आणि नंतर करण जोहरकडे जातो आणि जोरात मिठी मारतो. सुशांतची ही खोडकर स्टाईल पाहून करणसुद्धा खूप हसतो. त्यानंतर सुशांत भारतीकडे येऊन तिला मिठी मारतो. त्याच वेळी भारती सुशांतला खूप प्रेमळपाने किस करते.

सुशांतसिंग राजपूतच्या या अनोख्या शैलीने करण जोहर खूप आनंदित झाला आणि प्रभावित झाला होता. करण जोहरच्या फिल्म 'ड्राइव्ह' मध्ये सुशांतने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या व्यतिरिक्त करणच्या हातात आणखी एक चित्रपट होता, परंतु काही कारणास्तव तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. हा व्हिडिओ आणि करण जोहरसोबत काम करत असल्याचे सुचवते की कदाचित दोघांमध्ये वाद-विवाद झाले नव्हते. जेव्हा जेव्हा त्या दोघांना एकत्र पाहिले जायचे तेव्हा ते एकमेकांना अगदी मनापासून भेटत असत.

आपल्या सर्वांना माहितच आहे की सुशांतच्या निधनानंतर करण जोहरला बरेच ट्रोल केले गेले होते. अगदी अभिनेत्री कंगना रनौतने देखील करण जोहरवर इंडस्ट्रीमधून साइड ऑफ करण्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, सुशांतच्या मृत्यूनंतर करणला अतिशय वाईट वाटले. त्याने त्याच्या ट्रोलिंगबद्दल काहीच बोलले नाही, परंतु त्यांनी सुशांतच्या निधनानंतर शोक व्यक्त करणारे एक भावनात्मक पोस्ट लिहिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT