Kabir Khan Dainik Gomantak
मनोरंजन

'मी नेमकं जायचं कुठे?'; दिग्दर्शक कबीर खान यांनी व्यक्त केली आपली खंत

दैनिक गोमन्तक

Kabir Khan : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत देशभक्ती आणि राष्ट्रवादावर खुलेपणाने भाष्य केले आहे. कबीर खान त्या लोकांबद्दल बोलले जे त्यांना सतत ट्रोल करतात आणि पाकिस्तानात (Pakistan) जाण्यास सांगतात. सोशल मीडियावर लोक जेव्हा टीका करतात तेव्हा वाईट वाटते, असे ते म्हणाला. त्यांच्या मते, त्यांना वाटते की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने ट्रोल करणाऱ्यांना काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ('Where do I go?'; Director Kabir Khan expressed his grief)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कबीर खान म्हणाले की, 'सध्याच्या काळात सोशल मीडियामुळे लोकांना काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. 10 वर्षांपूर्वी लोक हे करू शकत नव्हते. आजच्या काळात शब्दांच्या निवडीबाबत लोकांना आपली जबाबदारी समजत नाही. हे वाईट वाटत असले तरी ते सत्य आहे. सोशल मीडियावर सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकता जास्त आहे हे मला जाणवते.

ते पुढे म्हणाले, 'माझे नाव खान आहे आणि त्यामुळे मला पाकिस्तानला जाण्यास सांगण्यात आले. मी एकदा पाकिस्तानात गेलो होतो, तिथे लष्कर-ए-तैयबाने मला भारतात परत जाण्यास सांगितले. त्यानुसार मी ना इकडचा आहे आणि ना तिकडचा आहे. प्रत्येक चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्याने स्वतःचे प्रतिबिंब असले पाहिजे. आपण कधी कधी चित्रपटांमध्ये तिरंगा दाखवतो, पण आज देशभक्ती आणि राष्ट्रवाद यात फरक आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

Goa Today's News Live: म्हापशात भेसळयुक्त 200 किलो बडीशेप जप्त

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

SCROLL FOR NEXT